Maharashtra News Live Update : भंडाऱ्यात अतिवृष्टीचा कहर, 25 हजार हेक्टर शेतीला फटका

| Updated on: Aug 12, 2022 | 9:34 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : भंडाऱ्यात अतिवृष्टीचा कहर, 25 हजार हेक्टर शेतीला फटका
मोठी बातमी

मुंबई : आज शुक्रवार 12 ऑगस्ट 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. मरीन ड्राईव्ह परिसरातील रस्त्यांवर तिरंगाच्या रंगाने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे मरीन ड्राईव्हच्या रस्त्यांना तिरंगाचं स्वरूप प्राप्त झालं आहे

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Aug 2022 06:47 PM (IST)

    महाराष्ट्रात जो बदल झालेला आहे तो पूर्णपणे जनतेने नाकारलेलाः जयंत पाटील

    – भाजपने ज्या पद्धतीने महाराष्ट्रात दुसरा पक्ष फोडून सत्ता स्थापन केलेली आहे हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही

    -हेच प्रतिबिंब या सभेमध्ये आपल्या समोर आलेले आहे

    – महाराष्ट्रात जो बदल झालेला आहे तो पूर्णपणे जनतेने नाकारलेला आहे असा याचा अर्थ आहे

  • 12 Aug 2022 06:38 PM (IST)

    अमरावतीत तरुणांच्या वादातून गोळीबार; कायदा व सुव्यवस्था प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर

    अमरावतीत तरुणांच्या वादातून गोळीबार..

    शाळेतून घरी जाणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थीनीच्या पायाला लागली गोळी..

    अमरावतीच्या पठाणचौक चाराबाजार परिसरात धक्कादायक घटना

    जखमी विद्यार्थीनीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू..

    अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर..

  • 12 Aug 2022 06:37 PM (IST)

    नागपुरात एका कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून विद्यार्थ्याने मारली उडी

    नागपुरात एका कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून विद्यार्थ्याने मारली उडी

    आत्महत्या करण्याचा प्रयत्न का ?.

    विद्यार्थ्याला करण्यात आलं अलेकसिस रुग्णालयात दाखल

    अद्याप कारण स्पष्ट नाही

    शिवम कटरे अस विद्यार्थ्यांचं नाव असल्याची माहिती

  • 12 Aug 2022 06:29 PM (IST)

    भाजपाच्या विरोधात आम्ही बिहारमधून सुरुवात केली: उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांचा भाजपावर हल्लाबोल

    भाजपनं महाराष्ट्र , झारखंड, राज्यात प्रादेशिक पक्षाचं काय केल बघितलं

    जो घाबरेल त्याला ईडीचा धाक दाखवला

    आणि जो खरेदी करता येईल तो केला

    पण बिहारी विकला जाणारा नाही

    भाजपाच्या विरोधात आम्ही बिहारमधून सुरुवात केली आहे

    आता आम्ही आणि नितीश कुमार एकत्रित आहोत

    सगळ्या विरोधी पक्षांनी आता एकत्रित बसण्याची वेळ आली आहे

    उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांचा भाजपावर हल्लाबोल

  • 12 Aug 2022 06:21 PM (IST)

    भाजप निरंतर काम करणारी संघटनाः अजय मिश्रा

    भाजप निरंतर काम करणारी संघटना

    केंद्रासहीत अनेक राज्यत भाजपचं सरकार

    मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले कामदेखील पूर्ण होईल

    500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांना पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत जोडणार

    रिफानरी प्रकल्पासाठी जमिन दिली नाही, प्रकल्पासाठी लवकरच प्रयत्न करणार

    आता आमचे सरकार आलं आमचे सरकार रिफायनरीसाठी नक्की प्रयत्न करणार

    आधीच्या सरकारने जमिन देण्यासंदर्भात सहयोग दिला नाही

  • 12 Aug 2022 06:10 PM (IST)

    बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट

    बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट

    जवळपास 20 मिनिटे झाली चर्चा

  • 12 Aug 2022 05:47 PM (IST)

    कल्याण-नगर मार्गावर झाड कोसळल्याने रहदारीसाठी रस्ता बंद

    कल्याण -नगर मार्ग रहदारी साठी बंद

    महामार्गाच्या रायता व रेवती गावाच्यामध्ये भेले मोठे झाड रस्त्यावर कोसळले

    तीन तासांपासून मार्ग बंद पडल्याने कल्याण-नगर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

    पोलीस ,अग्निशमन दलाचे जवान, सार्वजनिक(pwd) बांधकाम विभागाचे कामगार घटनास्थळी दाखल

    वृक्ष हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

  • 12 Aug 2022 05:35 PM (IST)

    इचलकरंजी महापालिकेचा कर्मचारी लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

    इचलकरंजी महापालिकेचा कर्मचारी एक हजार रुपयाची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

    महापालिकेचा लिपिक बाबासो माळी यांने मक्तेदाराकडे बिल काढण्यासाठी मागितली होती लाच

    कोल्हापुर अँटी करप्शन यांची धडक कारवाई

    इचलकरंजी महापालिका वर्तुळामध्ये माजली खळबळ

    इचलकरंजी महापालिका झाल्यानंतरची पहिली कारवाई

  • 12 Aug 2022 05:31 PM (IST)

    शिंदे फडणवीस सरकारविरोधात याचिका दाखल; राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांनी केली याचिका दाखल

    शिंदे फडणवीस सरकारविरोधात याचिका दाखल

    निवडणूका वेळेत घ्या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली

    आज याचिका झाली दाखल

    राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांनी याचिका केली दाखल

  • 12 Aug 2022 05:22 PM (IST)

    रिफायनरी समर्थकांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांची घेतली भेट

    रिफायनरी समर्थकांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांची घेतली भेट

    रत्नागिरी जिल्ह्याच्या रखडलेल्या प्रकल्पासंदर्भातील बैठकीआधी झाली भेट

    धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी 4 हजार एकर जागा देण्यास दर्शवली सहमती

    धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासंदर्भात एनजीओकडून दिली जातेय चुकीची माहिती

    एनजीओवर कारवाई करण्याची रिफायनरी समर्थकांनी केली मागणी

    केंद्र सरकारने प्रकल्प सुर करण्यासाठी पावले उचलण्याची केली मागणी

    जमिन मालक आणि धोपेश्वर रिफायनरी समर्थकांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना दिले निवेदन

  • 12 Aug 2022 05:16 PM (IST)

    बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सोनिया गांधींची भेट घेणार

    बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सोनिया गांधींची भेट घेणार

    जनपदवरील सोनिया गांधींच्या निवासस्थानी तेजस्वी भेट घेणार

    उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच घेणार भेट

  • 12 Aug 2022 05:13 PM (IST)

    सांगलीत एनडीआरएफचीच्या 2 टीम दाखल

    कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सतत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफचीच्या 2 टीम दाखल

    एडीआरफची अधिकारी सारंग कुर्वे आणि जवानांकडून कृष्णा नदीची पाहणी

    अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांच्याकडूनही माहिती

    आता सांगली, मिरजेतत एक टीम आणि दुसरी टीम आष्टा, इस्लामपूर येथे दाखल

    या 2 टीम मध्ये 44 जवान सज्ज आहेत

    सध्या सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी पोहचली 30 फुटावर,,,

  • 12 Aug 2022 05:00 PM (IST)

    शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री तानाजी सावंतांच्या हस्ते हर घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ

    शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री तानाजी सावंतांच्या हस्ते हर घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ

    पुण्यातील भारती विद्यापीठ ठाण्यातील कर्मचाऱ्यांसोबत तिरंगा दाखवत केला शुभारंभ

    काल घशामध्ये थोडा त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये नॉर्मल चेक अपसाठी नेण्यात आलं होतं

    मात्र आजपासून पुन्हा ते कार्यरत झालेत

  • 12 Aug 2022 04:31 PM (IST)

    भाजपचे नवनिर्वाचित मंत्री अतुल सावे यांचे औरंगाबाद शहरात होणार जंगी स्वागत

    भाजपचे नवनिर्वाचित मंत्री अतुल सावे यांचे औरंगाबाद शहरात होणार जंगी स्वागत

    औरंगाबाद विमानतळ आणि शहरात वेगवेगळ्या ठिकाणी होणार स्वागत

    भारतीय जनता पार्टीच्यावतीने केले जाणार जंगी स्वागत

    मंत्री पदी निवड झाल्यानंतर अतुल सावे पहिल्यांदाच मतदार संघात

  • 12 Aug 2022 04:23 PM (IST)

    भाजपकडून 15 ऑगस्टचंही राजकारणः अंबादास दानवे

    हिंगोलीः15 ऑगस्टचंही भाजपवाले राजकारण करत आहेत

    विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची टीका

    परभणीत झेंड्यावर कमळ असल्यावरुन दानवे यांच वक्त्यव्य..

  • 12 Aug 2022 04:15 PM (IST)

    छोट्या कार्यकर्त्यांला भाजपचा प्रदेशाध्यक्षःचंद्रशेखर बावनकुळे

    आज सर्वांकरिता आनंदाचा दिवस, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांला भाजपचा प्रदेशाध्यक्ष केलं...

    भाजपमध्ये छोटा कार्यकर्ता ही पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो हे पुन्हा सिद्ध झालं

    आपल्या सर्वांच्या साथीने मला काम करण्याची संधी

    अडीच वर्षेमध्ये मविआने भ्रष्टाचार केला

    मविआने अत्यंत जुलमी राजवट केली, पण आता त्यांचा अंत झाला

    जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे.

  • 12 Aug 2022 04:13 PM (IST)

    रेल्वे पोलिसांनी स्थानकाची सुरक्षा वाढवली

    स्वातंत्र्यदिनाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची घोषणा केली आहे.

    ही बाब लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी शहराच्या बंदोबस्तात वाढ केली आहे. यासोबतच रेल्वे पोलिसांनी प्रत्येक स्थानकावर बंदोबस्त वाढवला आहे.

    अंधेरी रेल्वे पोलिसांनी सर्व सुरक्षेची व्यवस्था केली आहे, विविध प्लॅटफॉर्म आणि स्थानकांवर तपासणी सुरू असून, काही शंका असल्यास प्रवाशाचाही शोध घेतला जात आहे.

  • 12 Aug 2022 04:12 PM (IST)

    "हर घर तिरंगा" या मोहिमेअंतर्गत आज पुण्यात बाईकरॅलीचे आयोजन करण्यात आले होते

    चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती

    अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिना निमित्त तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते

    यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थितीत होते

    ही रॅली दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, लोकमान्य टिळक पुतळा, तुळशीबाग राम मंदिर, तुळशीबाग गणपती मंडळ मार्गे लक्ष्मी रस्ता येथे तिरंगा रॅलीचा समारोप झाला

    यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व व्यापारी वर्ग देखील सहभागी होते

  • 12 Aug 2022 03:54 PM (IST)

    "हर घर तिरंगा" या मोहिमेअंतर्गत आज पुण्यात बाईकरॅली

    "हर घर तिरंगा" या मोहिमेअंतर्गत आज पुण्यात बाईक रॅली

    चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती

    अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा रॅलीचे आयोजन

    यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व व्यापारीवर्ग देखील सहभागी होते

  • 12 Aug 2022 03:50 PM (IST)

    महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून हमालाला भरबाजारात बेदम मारहाण

    - लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील एक महिला कर्मचारी बनली लेडी डॉन,

    - महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून उरुळी कांचन येथे हमालाला भरबाजारात अर्वाच्च्य शिवीगाळ बेदम मारहाण,

    - मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

    - भारती होले असं त्या मारहाण करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव

  • 12 Aug 2022 03:42 PM (IST)

    भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद; कोल्हापूर-गगनबावडा रस्ता बंद

    कोल्हापूर-गगनबावडा रस्ता झाला बंद, घाटामध्ये दरड कोसळू लागली

    भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळून रस्ता पूर्ण बंद

    गगनबावडा चौक येथे बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी घाट केला बंद

    करूळ घाट हलक्या वाहतुकीसाठी चालू

  • 12 Aug 2022 03:38 PM (IST)

    “मार्मिक” या व्यंगचित्र साप्ताहिकाचा उद्या 62 वा वर्धापन दिन

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या “मार्मिक” या व्यंगचित्र साप्ताहिकाचा उद्या 62 वा वर्धापन दिन

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या संध्याकाळी 6:30 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्याच्या राजकिय परिस्थितीवर व्यंगात्मक फटकारे मारणार

  • 12 Aug 2022 03:34 PM (IST)

    पंकजा मुंडे यांना आमदारकी, मंत्रीपद मिळवायचे असेल तेव्हाच ओबीसी आरक्षणाची आठवण येते

    पंकजा मुंडे यांना आमदारकी, मंत्रीपद मिळवायचे असेल तेव्हा ओबीसी आरक्षणाची आठवण येते

    ज्यावेळी मंत्रीपदावर होत्या, त्यावेळी उसतोड कामगारासाठी आणि ओबीसी समाजासाठी काय केलं

    पंकजा आपण भाजपाला मंत्रीपद मागण्यापेक्षा ओबीसी आरक्षण विरोधी भाजपातून बाहेर पडावे...

  • 12 Aug 2022 03:28 PM (IST)

    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवनिमित्त आज वसई-विरारमध्ये भव्य मोटारसायकल रॅली

    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त आज वसई-विरारमध्ये महापालिकेच्या माध्यमातून भव्य मोटारसायकल रॅली

    "हर घर तिरंगा" या उपक्रमाअंतर्गत या रॅलीचे आयोजन

    वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार, आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते विरारच्या विवा कॉलेज येथे पिवळा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ

    हर घर तिरंगा या अभियानाची शहरात माहितीसाठी रॅलीचा उद्देश

    विरार पश्चिम विवा कॉलेज ते वसई किल्ल्यापर्यंत 21 किलोमीटर रॅली काढून

  • 12 Aug 2022 03:11 PM (IST)

    पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्यात मस्ती करताना एक तरुण वाहून गेला

    -पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्यात मस्ती करताना एक तरुण वाहून गेला

    -यातून पर्यटकांनी आणि त्या पुलावरून वाहतूक करणाऱ्यांनी काही बोध घेतलेला नाही

    -इंद्रायणी नदीच्या या प्रवाहातील पाण्याजवळ जीवघेणी सेल्फी घेताना आज ही पर्यटक दिसून आले

    -नदीवरील पुलावरून वाहत्या पाण्यातून दुचाकी आणि पायी चालणारे दिसून आले

  • 12 Aug 2022 02:56 PM (IST)

    भुईबावडा घाटात दरड कोसळली

    दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी झाला बंद

    भुईबावडा मार्गे कोकणात जाणारी वाहतूक ठप्प

    प्रशासनाकडून दरड हटवण्याच काम सुरु

  • 12 Aug 2022 02:43 PM (IST)

    भंडाऱ्यात अतिवृष्टीचा कहर, 25 हजार हेक्टर शेतीला फटका

    भंडाऱ्यात अतिवृष्टीचा कहर

    25 हजार हेक्टर शेती क्षेत्राला फटका

    पिके पाण्याखील गेल्याने मोठं नुकसान

    शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी

  • 12 Aug 2022 02:16 PM (IST)

    उद्धव ठाकरेंचा मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याचा निर्धार, माजी नगरसेवकांना मार्गदर्शन

    उद्धव ठाकरेंचा मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याचा निर्धार

    उद्धव ठाकरेंनी केलं माजी नगरसेवकांना मार्गदर्शन

    सेनाभवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक

    जनतेचे काम करत रहा

    माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंच्या सूचना

  • 12 Aug 2022 01:14 PM (IST)

    उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांच्या बैठकीला सुरुवात

    उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांच्या बैठकीला सुरुवात

    सेनाभवनात माजी नगरसेवकांची बैठक

    महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक

  • 12 Aug 2022 01:02 PM (IST)

    खासदार उदयनराजे भोसले लाईव्ह

  • 12 Aug 2022 12:53 PM (IST)

    किनी टोल नाका बंद करण्यासाठी मनसे आक्रमक

    किनी टोल नाका बंद करण्यासाठी मनसे आक्रमक

    मुदत संपलेला किनी टोल नाका बंद करा, मनसेची मागणी

    मनसेचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ऑफिसबाहेर आंदोलन

    नोटांचा आहेर आणि तोरण अधिकाऱ्यांना भेट देणार

  • 12 Aug 2022 12:38 PM (IST)

    वर्धा भाजपाच्या तिरंगा रॅलीत फडणवीसांनी चालविली बुलेट

  • 12 Aug 2022 12:22 PM (IST)

    कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; तीन पूल, तेरा बंधारे पाण्याखाली

    कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; तीन पूल, तेरा बंधारे पाण्याखाली

    खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफचं पथक सांगली जिल्ह्याकडे रवाना

    आज दुपारपर्यंत एनडीआरएफचं पथक सांगलीत दाखल होणार

    कृष्णा नदीची पाणीपातळी 28 फूट दहा इंचांवर

    नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  • 12 Aug 2022 12:06 PM (IST)

    औरंगाबादच्या खादी ग्रामोद्योग दुकानात राष्ट्रध्वजाची टंचाई

    औरंगाबादच्या खादी ग्रामोद्योग दुकानात राष्ट्रध्वजाची टंचाई

    झेंडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी

    मात्र दुकानाचे शटर बंद करून कर्मचारी गायब

    झेंड्यासाठी नागरिक दुकानासमोर ठाण मांडून उभे

    दुकानावर मात्र झेंडे उपलब्ध नसल्याची नोटीस

  • 12 Aug 2022 11:38 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस लाईव्ह

    देवेंद्र फडणवीस लाईव्ह

  • 12 Aug 2022 11:01 AM (IST)

    मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

    मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

    अमित ठाकरे विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार

    भव्य बाईक रॅली काढत अमित ठाकरे कार्यक्रमस्थळी दाखल होणार

  • 12 Aug 2022 10:45 AM (IST)

    राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा बंद

    राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा बंद

    पावसाचा जोर कमी झाल्याने तीन नंबरचा दरवाजा बंद

    सध्या चार दरवाजामधून सुरू आहे साडेपाच हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

    पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फुटांवर

  • 12 Aug 2022 10:42 AM (IST)

    36 तासानंतर वैनगंगा नदीच्या पाणीपातळी घट; पुराचा धोका टळला  

    36 तासानंतर वैनगंगा नदीच्या पाणीपातळी घट

    पुराचा धोका टळला, मात्र पाण्यााच विसर्ग सुरूच

    नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    पुढील तीन दिवस हवामान खात्याकडून भंडारा जिल्ह्यात ग्रीन अलर्ट

  • 12 Aug 2022 10:16 AM (IST)

    सेवाग्राममध्ये बापूंच्या कुटीत आल्यावर आत्मिक शांतता लाभते - फडणवीस 

    सेवाग्राममध्ये बापूंच्या कुटीत आल्यावर आत्मिक शांतता लाभते - फडणवीस

    महात्मा गांधींमुळेच स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव अनुभवतोय - फडणवीस

    उपमुख्यमंत्री फडणवीस सेवाग्राममध्ये

  • 12 Aug 2022 09:53 AM (IST)

    अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी पुण्यात जय्यत तयारी

    अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी पुण्यात जय्यत तयारी

    अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी पुण्यात मनसैनिकांनी बोलवली क्रेन

    क्रेनच्या मदतीने हार घालत मनसैनिक करणार अमीत ठाकरे यांचे स्वागत

    थोड्याच वेळात अमित ठाकरे पुण्यातील राजमहाल  निवासस्थानी दाखल होणार

    पुण्यातील निवासस्थानाबाहेर मनसे सैनिकांची गर्दी

  • 12 Aug 2022 09:24 AM (IST)

    शाहुवाडी तालुक्यात भूस्खलन

    शाहुवाडी तालुक्यात भूस्खलन

    करंजफेण इथल्या धावडा खिंडीत भूस्खलन

    भूस्खलनमुळे वाहतुकीला अडथळा

    रस्त्यावर पडलेला मलबा हटवला वाहतूक पुन्हा सुरू

  • 12 Aug 2022 09:18 AM (IST)

    सोलापुरात 'एमआयएम'ला खिंडार, 6 नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश

    सोलापुरात 'एमआयएम'ला खिंडार

    सहा नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश

    राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश

    नगरसेवक तौफक शेख यांच्यासह 6 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार

  • 12 Aug 2022 08:34 AM (IST)

    केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा घेणार धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाचा आढावा

    रत्नागिरी- केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा घेणार धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाचा आढावा

    जिल्ह्यातील विविध योजना आणि विकासात्मक कामांसाठी आढावा बैठक

    बैठकीआधी रिफायनरी प्रकल्प समर्थक घेणार केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रांची भेट

    धोपेश्वर बारसू सोलगावातील जमिन अधिग्रहणासाठी जमिन मालकांची देणार संमतीपत्र

    धोपेश्वर रिफायनरीच्या दृष्ट्रीने आजचा महत्वाचा दिवस

    योगायोगाने केंद्रीय मंत्री नारायण राणे देखिल रत्नागिरी दौऱ्यावर...

  • 12 Aug 2022 08:24 AM (IST)

    ऐन सणासुदीच्या काळात हजारो प्रवाशांना रेल्वेच्या मेगाब्लॉचा फटका

    ऐन सणासुदीच्या काळात हजारो प्रवाशांना रेल्वेच्या मेगाब्लॉचा फटका..

    14-15 ऑगस्ट ला अंबा एक्सप्रेस सह अनेक गाड्या रद्द...

    भुसावळ मंडळातील पाचोरा येथे दोन दिवस गार्ड रिमॉडलिंगचे काम केले जानार..

    नागपूर-पुणे-नागपूर-मुंबई मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द...

  • 12 Aug 2022 08:17 AM (IST)

    बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, पिडीत अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

    बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना..

    भावानेच केला अल्पवयीन बहिणीवर नऊ महिने अत्याचार..

    पिडीत अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या..

    औरंगाबादेतील विरगांव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल..

    ANC:- एकीकडे भाऊ-बहिणीचे नाते भक्कम करणारा सण म्हणजे रक्षाबंधन असताना मात्र दुसरीकडे भाऊ बहिणाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.चुलत भाऊच आपल्या अल्पवयीन बहिणीवर तब्बल नऊ महिन्यांपासून बलात्कार करत असल्याने पीडित अल्पवयीन मुलीने औषध घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील वैजापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विरगाव पोलिसांनी आरोपी चुलत भावाला ताब्यात घेऊन अटक केली असून, त्याच्यावर पोक्सो कायद्यान्वये तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 12 Aug 2022 08:13 AM (IST)

    मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदा जळगावात आलो, कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं

    मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदा जळगावात आलो, कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं

    आता जबाबदारी मोठी आहे

    गेल्या अडीच वर्षात राज्यात विकास खुंटला होता, विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं मोठं आव्हान आमच्यासमोर आहे, आता डबल इंजिनचं सरकार आहे, राज्यात रखडलेला विकास मार्गी लागेल

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही दमदार नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला राज्याला पुढं न्यायचं आहे

    खाते वाटप लवकरच होणार, अधिवेशन समोर असल्याने त्यापूर्वीच खाते वाटप होणार

    गिरीश महाजन यांचा खडसेंना टोला

    गुलाबराव पाटील, मी स्वतः ओबीसी आहोत, त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय केला हा खडसेंचा आरोप चुकीचा, तुम्ही आहेत म्हणजे सगळे ओबीसी असं समजण्याचं कारण नाही, आपण थोडं शांत रहा, तू तू मै मै करू नका

    पंकजा मुंडे कुठे नाराज आहेत, असं मला वाटतं नाही, पक्षश्रेष्ठी त्यांचा विचार करतील, त्यांना मोठं पद मिळेल,

    मंत्रिमंडळ विस्तारानंतर थोडीफार नाराजी असतेच मग ते एका पक्षाचे सरकार असलं तरी असतेच, थोडे दिवस ही नाराजी असते

    मागच्या सरकारमध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्री मंत्रालयात झाले नाही, त्यांनी ऑनलाईन सरकार चालवलं, ते आमदारांना भेटले नाहीत मंत्र्यांना भेटले नाहीत जनता तर दूरच राहिली त्यामुळे राज्यात अनेक प्रश्न रखडले

    गिरीश महाजन ऑन संजय राठोड

    ज्या सरकारने संजय राठोड यांना क्लिन चिट दिली आता तेच प्रश्न उपस्थित करताहेत, म्हणजे चित भी हमारी आणि पट भी हमारी

    संजय राठोड यांच्याबाबतीत चित्रा वाघ यांचं मत वैयक्तिक

  • 12 Aug 2022 08:07 AM (IST)

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपींकडून वसुली

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपींकडून वसुली केली जावी,

    यासाठी अलीकडेच माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी नियुक्ती झाली.

    ८ सप्टेंबरपासून या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात होणार आहे.

  • 12 Aug 2022 08:06 AM (IST)

    कोल्हापुरातील गणेश मूर्ती दान चळवळीला आमदार प्रकाश आवाडे यांचा खो

    कोल्हापुरातील गणेश मूर्ती दान चळवळीला आमदार प्रकाश आवाडे यांचा खो

    पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जन आला आवाडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडून मिळवली परवानगी

    आमदार प्रकाश आवाडे यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना केल्या सूचना

    पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जन करू नये यासाठी न्यायालयानेही दिलेत तब्बल 13 आदेश

    न्यायालयाचा अवमान करून मूर्ती विसर्जन करणार का पर्यावरण प्रेमींचा सवाल

    परवानगीच्या सूचना दिल्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाही रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता

    काही पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या चळवळीत सहभाग घेणाऱ्या आमदार आवाडे यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे आश्चर्य

  • 12 Aug 2022 07:19 AM (IST)

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे.

    त्यात राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला प्रचार-प्रसिद्धीसाठी बॅनर पाठविले आहे. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांनंतर इतर मंत्र्यांचे नाव व फोटो असणे आवश्यक आह.

    परंतु या बॅनरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आहे.

    त्यामुळे ग्रामविकास विभागाने प्रोटोकॉल मोडल्याची चर्चा आहे.

    त्याच प्रमाणे या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्याने आश्चर्च व्यक्त करण्यात येत आहे.

  • 12 Aug 2022 07:18 AM (IST)

    बोगस टीईटी प्रमाणपत्र घेणाऱ्या गोंदियातील 9 जणांचा समावेश

    -बोगस टीईटी प्रमाणपत्र घेणाऱ्या गोंदियातील 9 जणांचा समावेश.....

    -दोन जणांनी घेतला नोकरीचा लाभ...

    -9 जणांवर होणार कारवाई...

    -गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ......

  • 12 Aug 2022 07:17 AM (IST)

    केंद्रीय मंत्री नारायण राणे आज रत्नागिरी दौऱ्यावर

    रत्नागिरी- केंद्रीय मंत्री नारायण राणे आज रत्नागिरी दौऱ्यावर

    नारायण राणेंसोबत माजी खासदार निलेश राणेंची उपस्थिती

    एका दिवसाचा धावता कार्यक्रम

    लोकमान्य टिळक स्मारकाला देणार भेट

    हरघर तिरंगा कार्यक्रमाला सुद्धा लावणार हजेरी

  • 12 Aug 2022 07:17 AM (IST)

    मंत्री दिपक केसरकर आज पुणे दौऱ्यावर

    मंत्री दिपक केसरकर आज पुणे दौऱ्यावर

    मंत्री केसरकर संभाजीराजे आणि उदयनराजे यांची भेट घेणार

    लाल महाल, शनिवार वाड्याची करणार पाहणी

  • 12 Aug 2022 07:16 AM (IST)

    आमगाव तालुक्यातील ससाकरणटोला येथे मलेरियाचे थैमान

    -आमगाव तालुक्यातील ससाकरणटोला येथे मलेरियाचे थैमान....

    -मलेरियाचे आढळले दोन रुग्ण तर एक महिला रुग्णाचा मृत्यु.....

    -गावात भीतीचे वातावरण.....

    -आरोग्य यंत्रणा गावात दाखल.....

  • 12 Aug 2022 07:16 AM (IST)

    शिरूर मधील 5 आणि पुण्यातील 8 मतदारसंघात जाऊन पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार

    मनसे विद्यार्थी सेनेची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आज पासून पुणे दौऱ्यावर

    शिरूर मधील 5 आणि पुण्यातील 8 मतदारसंघात जाऊन पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार

    12 ऑगस्टला अमित हे कोथरूड, खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशी, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कसबा, कॅन्टोन्मेंट भागातील मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

    त्यासोबतच कोथरुडमध्ये बाईक रॅलीतसुद्धा सहभागी होणार

    13 तारखेला पर्वती, हडपसर, पुरंदर, पिंपरी चिंचवड, मावळ या मतदारसंघाचा दौरा करणार आणि 14 ऑगस्टला अमित ठाकरेंता शिरूर, चाकण आणि खेडमध्ये दौरा असणार

  • 12 Aug 2022 06:47 AM (IST)

    -आमगाव तालुक्यातील ससाकरणटोला येथे मलेरियाचे थैमान

    -आमगाव तालुक्यातील ससाकरणटोला येथे मलेरियाचे थैमान....

    -मलेरियाचे आढळले दोन रुग्ण तर एक महिला रुग्णाचा मृत्यु.....

    -गावात भीतीचे वातावरण.....

    -आरोग्य यंत्रणा गावात दाखल.....

  • 12 Aug 2022 06:38 AM (IST)

    आज कोयना धरणाचे दरवाजे उघडणार

    आज कोयना धरणाचे दरवाजे उघडणार

    कोयना धरणाचे 4 वक्री दरवाजे 1 फुट 6 इंच उघडून 8000 क्युसेक्स पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात करणयात येणार

    8000 कयुसेक दरवाजेतुन 2100कयुसेक पायथा वीज गृहातुन असे एकुण 10100कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू होणार

    सकाळी दहा वाजता धरणाचे चार दरवाजे 1फुट 6 इंचाने उघडणार

Published On - Aug 12,2022 6:31 AM

Follow us
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.