या बाजार समितीत कांदे विक्रीसाठी आलेला ट्रॅक्टर चोरीला, पोलिस म्हणतात…

मालेगाव उमराना बाजार समितीतून घडला ट्रॅकर चोरीचा गेल्याचा प्रकार उजेडात आला आहे. विशेष म्हणजे शेतकरी त्या बाजार समितीमध्ये कांदा विक्री करण्यासाठी गेला होता. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.

या बाजार समितीत कांदे विक्रीसाठी आलेला ट्रॅक्टर चोरीला, पोलिस म्हणतात...
malegaon
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 25, 2023 | 8:54 AM

मनोहर शेवाळे, मालेगाव : उमराना मार्केटमध्ये (umrana kanda market) कांदा विक्रीस गेलेल्या शेतकऱ्याचे ट्रॅक्टर चोरट्यानी लांबवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बागलाण (baglaan) तालुक्यातील सुराने येथील शेतकरी सुभाष अहिरे यांनी कांदा विक्री केल्यानंतर पावती करण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्याकडे गेला. चोरट्यांनी चक्क ट्रॅकरच पळवून नेल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ट्रॅकरची शोधाशोध केली असता मार्केट जवळील पेट्रोल पंप वर चोरटे सीसीटिव्हीमध्ये (CCTV) कैद झाले, असून देवळा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हा प्रकार उजेडात आल्यामुळे पोलिस सुध्दा चक्रावले आहेत. दिवसाढवळ्या बाजार समितीत मधून ट्रॅक्टर गायब झाल्यामुळे बाजार समितीमधील लोकांना सुध्दा धक्का बसला आहे.

नेमकं काय झालं

शेतकरी सुभाष अहिरे हे आपला ट्रॅक्टर घेऊन कांदा विक्रीसाठी उमराना बाजार समितीमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी कांदी विक्री केली आणि ट्रॅक्टर एका बाजूला लावला होता. कारण त्यांना पावती करायची होती. त्यावेळी तिथं दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी तिथून ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना घडली आहे. ज्यावेळी ट्रॅक्टर गायब झाल्याचं तिथल्या लोकांना समजलं, त्यावेळी त्यांना सुध्दा धक्का बसला. शेतकरी सुभाष अहिरे यांनी टॅक्टरचा आजूबाजूला शोध घेतला, परंतु टॅक्टर कुठेचं दिसत नसल्यामुळे त्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठले.

सीसीटिव्हीत दिसले चोरटे

पोलिसांनी बाजार समितीच्या जवळपास असणारे सीसीटिव्ही तपासले, त्यावेळी त्यांना पेट्रोलपंप जवळ असणाऱ्या एका सीसीटिव्हीत चोरटे दिसले आहेत. पोलिस त्या चोरट्यांना शोध घेत आहेत. लवकरचं त्यांना ताब्यात घेऊ असं आश्वासनं पोलिसांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. मालेगाव उमराना बाजार समितीमध्ये सगळीकडं सीसीटिव्ही असावेत अशी आता शेतकरी मागणी करु लागले आहेत.