जावईच निघाला भामटा…सासूचे लाखों रुपयांचे दागिने चोरले कसे चोरले ?

| Updated on: Sep 29, 2022 | 12:51 PM

सासू मीरा शशिकांत गंभिरे यांनी ध्रुवनगर येथील बंद घराची किल्ली चोरून साडेदहा लाखांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात केली होती.

जावईच निघाला भामटा...सासूचे लाखों रुपयांचे दागिने चोरले कसे चोरले ?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिकमध्ये घडलेल्या एका चोरीची मोठी चर्चा आहे. ‘जावई माझा भला नव्हे चोर’ या वाक्याचा प्रत्यय नाशिकमध्ये (Nashik) एका सासूला आला आहे. बेरोजगार असलेल्या जावयाने सासूच्या घराची किल्ली चोरत तब्बल साडेदहा लाख रुपयांची चोरी केली केल्याची घटना समोर आली आहे. जावयाची खोड नाशिकच्या गंगापूर पोलीसांनी (Nashik Police) उघड केली असून त्याच्यावर सासूने दिलेल्या तक्रारीवरुन गंगापूररोड पोलीस ठाण्यात जावयावर चोरीचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. साडेदहा लाखांपैकी साडे नऊ लाखांचे दागिने त्याच्याकडून हस्तगत करण्यात गंगापूर रोड पोलीसांना यश आले आहे.

अटक केलेल्या जावयाचे नाव आलोक दत्तात्रय सानप असे असून मखमलाबादरोड परिसरात राहण्यास आहे.

सासू मीरा शशिकांत गंभिरे यांनी ध्रुवनगर येथील बंद घराची किल्ली चोरून साडेदहा लाखांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात केली होती.

त्यातच गंगापूर पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेत तपासाला सुरुवात केली होती त्यात तक्रारदार गंभीरे यांच्याच जावयाची देहबोली असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते.

त्यांनी त्याला गंगापूर पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याने रात्री सासूचे दागिने चोरल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.

जावई सानप याने चोरी केल्याच्या नंतर त्याच्याकडून 24 तासाच्या आतमध्ये साडेनऊ लाख रुपयांचे 249 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहे.

तक्रारदार सासू मीरा गंभिरे यांचा लेडीज पार्लरचा व्यवसाय आहे. त्यांच्या मुलीने आलोक सानप यांच्याशी प्रेमविवाह केला आहे.

संशयित आरोपी असलेला आलोक सानप याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले असून तो सध्या बेरोजगार असून सासूरवाडीला त्याचे नेहमी जाणेयेणे होते.

दरम्यान त्याला सासुरवाडीच्या घरातील सर्वच गोष्टीची माहिती होती आणि हीच संधी साधून त्याने घराची दुसरी चावी चोरली होती.