AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NIAच्या देशभरातील छापेमारीनंतर अमित शाह यांनी बोलावली तातडीची बैठक! अजित डोवाल यांच्यासोबत बैठकीत नेमकी काय चर्चा?

NIA Raids : राज्यातील मुंबई, नवी मुंबई, भिवंडी आणि पुण्यातील कोंढवा परिसरात छापा टाकण्यात आलाय. पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या इस्लामिक संघटनेच्या शाखांवर छापे टाकण्यात आलेत.

NIAच्या देशभरातील छापेमारीनंतर अमित शाह यांनी बोलावली तातडीची बैठक! अजित डोवाल यांच्यासोबत बैठकीत नेमकी काय चर्चा?
अमित शाह यांची अधिकाऱ्यांसोबत बैठकImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Sep 22, 2022 | 12:27 PM
Share

नवी दिल्ली : एनआयएच्या (NIA Raids) देशभरातील छापेमारीनंतर आता राजधानी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या जात आहेत. राजधानी दिल्लीमध्ये अमित शाह (Amit Shah) यांनी तातडीची बैठक बोलावलीय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीतील महत्त्वपूर्ण चर्चेतून नेमका काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एनआयए छापेमारीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.

गेल्या काही दिवसांपासून एनआयए ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालंय. आठवड्याच्या सुरुवातीपासून देशभरात एनआयएनने छापेमारी करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता दिल्लीत अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारीदेखील या बैठकीला हजर आहेत. त्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही बैठकीला हजेरी लावल्याची माहिती मिळतेय.

पाहा व्हिडीओ : अजित डोवालही बैठकीला हजर

महाराष्ट्रात कुठे कुठे छापेमारी?

संपूर्ण देशात एनआयए छापेमारी करतंय. त्यात महाराष्ट्रही असून राज्यातील मुंबई, नवी मुंबई, भिवंडी आणि पुण्यातील कोंढवा परिसरात छापा टाकण्यात आलाय. पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या इस्लामिक संघटनेच्या शाखांवर छापे टाकण्यात आलेत. एकूण 20 जणांना अटकही करण्यात आलीय. एनआयएसोबत ईडी आणि एटीएसनेही मिळून ही संयुक्त कारवाई केलीय.

समोर आलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या नेरुळमधील सेक्टर 23 मध्ये पीएफआयच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आलीय. गेल्या सहा तासांपेक्षा जास्त वेळ अधिकाऱ्यांकडून या कार्यालयात तपास केला जातोय. टेरर फंडिंगच्या संशयातून हा तपास केला जातोय.

मुंबई, पुणे, नाशिक नवी मुंबई, मालेगाव, भिवंडी, औरंगाबाद या ठिकाणी एनआयएनं छापेमारी करत कारवाई केलीय. छापेमारी केलेल्या सर्व ठिकाणी कसून तपास केला जातोय. त्यामुळे पीएफआयचं धाबं दणाणलं आहे.

11 राज्यात छापे

फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर उत्तर प्रदेश, केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडूतही एनआयएच्या पथकानं छापेमारी केलीय. टेटर फंडिंग होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनआयए एक्शन मोडमध्ये आलंय. देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांना टेरर फंडिंग होत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी समोर आणली होती. त्यानंतर 11 राज्यात छापे टाकण्यात आलेत.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?