
Crime News : सध्या लग्नसराई चालू आहे. तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यातील कोणाचेतरी लग्न यांदा असेलच. देशभरात रोज शेकडो लग्न होत आहेत. पण या लग्नाच्या काळात काही अचंबित करून टाकणाऱ्याही घटना समोर येत आहेत. हरिद्वारमध्ये तर एक अजब प्रकार घडला आहे. होणाऱ्या नवऱ्याने मुलीला केलेल्या काही मागण्यांमुळे थेट लग्न मोडलं आहे.
विशेष म्हणजे लग्न मोडल्यानंतर हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार राणीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीला तिच्या होणाऱ्या नवऱ्याने हुंडा मागितला होता. तसेच या मुलाने तरुणीसी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करून तिची छेडछाड केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितल्यानुसार राणीपूर येथे एक तरुणी राहते. या तरुणीचे लग्न 19 नोव्हेंबर 2024 रोजी शिवा या तरुणाशी होणार होते. हा तरुण सहारनपूर जिल्ह्यातील जाटव नगर येथील रहिवासी आहे. होळीच्या दिवशी हा तरुण त्याच्या होणाऱ्या बायकोच्या घरी आला. त्याने आपले लग्न होणार आहे, असे सांगत तरुणीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तरुणीने मात्र याला विरोध केला.
तरुणीने विरोध केल्यानंतर आरोपी तरुणाने तिच्यावर दबाव टाकला. त्यानंतर तरुण तरुणीला काकांकडे घेऊन गेला. मात्र तरुणीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर होळीच्या काही दिवसांनी तरुणाने हुंड्याची मागणी केली. तरुणीने हुंड्यालाही नकार दिल्यानंतर अपशब्द वापरत तरुणाने लग्न मोडून टाकलं. हे लग्न का मोडलं याचा जाब विचारण्यासाठी तरुणीच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या घरी कॉल केला. मात्र तरुणाच्या कुटंबीयांनी अपशब्द वापरत लग्न करणार नसल्याचं सांगितलं. या घनटेनंतर तरुणीच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. तरुणीही मोठ्या मानसिक धक्क्यात आहे. आता हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.