प्रेयसीसाठी खोदलेल्या खड्ड्यात स्वतःच गेला! 65 वर्षीय गर्लफ्रेण्डची हत्या, मृतदेह पुरताना बॉयफ्रेण्डचा हार्ट अटॅकने मृत्यू

| Updated on: May 18, 2022 | 2:19 PM

जोसेफ मॅककिनन (60 वर्ष) याने 65 वर्षीय गर्लफ्रेण्ड पॅट्रिशिया डेंट यांची हत्या केली. घराच्या आवारात खड्डा खणून प्रेयसीला गाडत असतानाच त्याला हार्ट अटॅक आल्याचा दावा केला जातो.

प्रेयसीसाठी खोदलेल्या खड्ड्यात स्वतःच गेला! 65 वर्षीय गर्लफ्रेण्डची हत्या, मृतदेह पुरताना बॉयफ्रेण्डचा हार्ट अटॅकने मृत्यू
गर्लफ्रेण्डची हत्या, बॉयफ्रेण्डचा हार्ट अटॅकने मृत्यू
Image Credit source: टीव्ही 9
Follow us on

न्यूयॉर्क : इतरांसाठी खड्डे खणतो, तो स्वतःच त्या खड्ड्यात पडतो, या आशयाच्या हिंदी म्हणीचा प्रत्यय देणारी घटना नुकतीच समोर आली आहे. एका व्यक्तीने आधी आपल्या गर्लफ्रेण्डचा गळा दाबून खून (Girlfriend Murder) केला. त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) त्याचाही मृत्यू झाला. घराच्या आवारात खड्डा खणून प्रेयसीला गाडत असतानाच त्याला हार्ट अटॅक आल्याचा दावा केला जातो. धक्कादायक म्हणजे मयत महिलेचं वय 65 वर्ष असून हत्या करणारा आरोपी प्रियकर 60 वर्षांचा होता. अमेरिकेत (US Crime News) ही हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या रिपोर्टनुसार जोसेफ मॅककिनन (60 वर्ष) याने 65 वर्षीय गर्लफ्रेण्ड पॅट्रिशिया डेंट यांची हत्या केली. जोसेफ मॅककिनन हा दक्षिण कॅरोलिनाचा मूळ रहिवासी होता. त्याने आपल्या मैत्रिणीची ट्रेंटन येथील त्यांच्या राहत्या घरात हत्या केली. एजफिल्ड काउंटी शेरीफ कार्यालयाने ही माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली की एक व्यक्ती त्याच्या कंपाऊंडमध्ये बेशुद्ध पडली आहे. यानंतर तपास अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना मॅककिननचा मृतदेह आढळून आला.

खड्ड्यात प्रेयसीचा मृतदेह

याच वेळी त्यांना खोदलेल्या खड्ड्यात आणखी एक मृतदेह आढळून आला. तो पॅट्रिशिया डेंट यांचा असल्याचं स्पष्ट झालं. ती मॅककिननसोबत तिथे राहत होती.

प्रियकराला हार्ट अटॅक

या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन अहवालाची तपासणी केली असता पॅट्रिशिया डेंटचा गळा दाबून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. तर मॅककिननचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं पोस्टमार्टममध्ये समोर आलं.

तपास अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार मॅककिननने घराच्या आत डेंटवर हल्ला केला होता. मॅककिनन तिचा मृतदेह एका पिशवीत घालून खड्ड्यात पुरणार ​​होता. तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा, असं मानलं जात आहे.