प्रियकराला मुलीच्या खोलीत पाठवलं आणि बाहेरुन…पोटच्या मुलीचा आईवर खळबळजनक आरोप

तिच्या आईचे गावातील एका युवकासोबत अनैतिक संबंध होते. युवकाच नाव करन आहे. तो तिच्या आईला भेटायला यायचा. तो येताच आई त्याला रुममध्ये घेऊन जायची आणि दरवाजा बंद करायची असं पीडितेने सांगितलं.

प्रियकराला मुलीच्या खोलीत पाठवलं आणि बाहेरुन...पोटच्या मुलीचा आईवर खळबळजनक आरोप
Crime Against Women
Image Credit source: Representative Image
| Updated on: Jul 28, 2025 | 4:45 PM

एका अल्पवयीन मुलीने आपल्या आईवर गंभीर आरोप केला आहे. आईच्या प्रियकराने माझ्यावर बलात्कार केला असा आरोप पीडित मुलीने केला आहे. या कृत्यात आईनेच प्रियकराची साथ दिली असा पीडित मुलीचा आरोप आहे. या घटनेसंबंधी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकराविरोधात रेप आणि पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरु करण्यात आलाय. हे धक्कादायक प्रकरण उत्तर प्रदेशच्या औरैयामधील आहे.

पोलिसांच्या मते हे विचारपूर्वक रचलेलं एक कारस्थान आहे. पीडिता औरैयाच्या कोतवाली पोलीस ठाणे क्षेत्रात राहते. पोलिसांनी सांगितलं की, ती 11 व्या इयत्तेची विद्यार्थिनी आहे. तिच्या आईचे गावातील एका युवकासोबत अनैतिक संबंध होते. युवकाच नाव करन आहे. तो तिच्या आईला भेटायला यायचा. तो येताच आई त्याला रुममध्ये घेऊन जायची आणि दरवाजा बंद करायची असं पीडितेने सांगितलं.

बलात्काराचा व्हिडिओ बनवला

करन दोन दिवसांपूर्वी तिच्या आईला भेटायला आलेला. त्यावेळी तो अचानक तिच्या खोलीत घुसला व तिच्यावर जबरदस्ती करु लागला. इतकच नाही, आईने एकदिवस आधीच आरोपी युवकाला तिच्या खोलीत पाठवून बाहेरुन दरवाजाची कडी लावलेली. त्यानंतर तिच्यावर झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ बनवला.

तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल

पीडितेनुसार, जेव्हा तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत वडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दोन्ही आरोपींनी तिला मारहाण केली. सोबतच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपी करनने त्याआधी अनेकवेळा छेडछाड केलेली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस चौकशीत काय समजलय?

कोतवाल राजकुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच मेडिकल करण्यात आलं आहे. पीडिता वारंवार तिचं स्टेटमेंट बदलत आहे. आरोपांमध्ये तारतम्यतेचा अभाव आहे. पीडितेला आईला फसवायच असल्याचा संशय आहे. चौकशीमध्ये पीडितेची आई आणि तिच्या वडिलांमध्ये वाद असल्याच समोर आलय. या वादात पीडिता वडिलांसोबत आहे. घटनेसंदर्भात पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.