
लग्नानंतर आपल्या जोडीदाराप्रती प्रामाणिक असलं पाहिजे, असं सगळेच म्हणतात. पण काही असे सुद्धा असतात, ज्यांचं एका पार्टनरने मन भरत नाही. ते लग्नानंतर दुसऱ्याशी संबंध ठेवतात. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये एका महिलेने असच केलं. ती परपुरुषाच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली की, नवऱ्यासमोरच त्याच्याशी संबंध ठेऊ लागली. नवऱ्याला आधी वाटलं की, वेळेबरोबर सर्व ठीक होईल. पण अखेरीस त्याने स्वत:ला फाशी लावून जीवन संपवलं.
या घटनेने भागात खळबळ उडाली आहे. मृतकाच्या नातेवाईकाची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. त्यांनी पोलिसांकडे आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ककोड पोलीस ठाणे क्षेत्रातील वैर बादशाहपूरच हे प्रकरण आहे. आसिफ नावाच्या युवकाच रुबीना नावाच्या युवतीसोबत लग्न झालं. पण रुबीनाच दुसऱ्याच परपुरुषासोबत अफेअर सुरु होतं. आरोप आहे की, रुबीना बॉयफ्रेंड सलीमाला घरी बोलावू लागली. दोघे आसिफच्या बेडरुममध्ये त्याच्यासमोरच संबंध बनवू लागले.
काय आहे प्रकरण?
हे पाहून आसिफ आतमधून पूर्णपणे तुटून गेला. त्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. नातेवाईकांनी त्याचा मृतदेह पाहिल्यानंतर एकच हंबरडा फोडला. पोलिसांना तात्काळ सूचना दिली. पोलिसांनी नंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठून गुन्हा दाखल केला. आता या केसमध्ये पुढील कारवाई सुरु आहे.
पतीसमोरच प्रियकराशी शरीरसंबंध
आसिफच्या नातेवाईकांनुसार रुबीनाचे तिच्या गावातील सलीम नावाच्या युवकासोबत अनैतिक संबंध होते. आरोप आहे की, रुबीना आपल्या पतीला नशेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध करायची. त्यानंतर पती आसिफसमोरच प्रियकर सलीमशोबत शारीरिक संबंध ठेवायची. हा मानसिक छळ आणि अपमानाने दु:खी झालेल्या आसिफने 11 जुलैच्या रात्री आपल्या घरातच फाशी घेऊन जीवन संपवलं.
‘तो मेला तरच चांगलं आहे’
पीडित आसिफने 9 जुलैला हा सगळा प्रकार आपल्या भावाला सांगितला. आसिफ म्हणाला की, मला खूप अपमानित झाल्यासारखं आणि हतबल वाटतय. पत्नी रुबिना त्याला टोमणे मारायची. कमीत कमी हे पाहून तरी तू मरशील आणि आमचा मार्ग मोकळा होईल. जेव्हा पीडित व्यक्तीच्या भावाने ही गोष्ट वहिनीच्या भावाला म्हणजे रुबीनाच्या भावाला सांगितली. तेव्हा तो म्हणाला की, तुझा भाऊ आसिफ माझ्या बहिणीच्या लायक नाही. तो मेला तरच चांगलं आहे असं म्हणाला. ककोड पोलिसांनी रुबीना, सलीम आणि शाहरुख विरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरु केला आहे.