30 वर्षीय महिला बँक अधिकाऱ्याचा गळफास, सुसाईड नोटमधून गुंता सुटणार?

महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील आरोपांच्या आधारे तीन पोलीस अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

30 वर्षीय महिला बँक अधिकाऱ्याचा गळफास, सुसाईड नोटमधून गुंता सुटणार?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 5:01 PM

लखनौ : 30 वर्षीय महिला बँक अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन महिलेने स्वतःचं आयुष्य संपवलं. उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. तिघा पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांमुळे महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

सीलिंगला गळफास घेतलेल्या अवस्थेत

खवसपुरा भागात महिला बँक अधिकारी भाड्याने घर घेऊन राहत होती. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा महिला अधिकारी सीलिंगला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.

महिलेच्या घरात सुसाईड नोट

पोलिसांना महिलेच्या घरात सुसाईड नोट सापडली आहे. ही महिला 2017 पासून पंजाब नॅशनल बँकेमध्ये नोकरी करत होती. महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील आरोपांच्या आधारे तीन पोलीस अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान महिलेच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. महिला मूळ उत्तर प्रदेशातील लखनौमधील राजाजीपुरम भागातील रहिवासी आहे. तिचे कुटुंबीय तिथे राहतात. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

टायर फुटल्याने सांगलीत कारने दिंडीला चिरडलं, तिघा भाविकांचा करुण अंत

लिंबोणीच्या झाडामध्ये गांजाची लागवड, पोलिसांनी सुगावा लागला, छापा टाकून 9 लाखांचा गांजा जप्त!

CCTV VIDEO | पाठलाग करुन तरुणाची सोन्याची चेन हिसकावली, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद