सावत्र भाऊ, म्हणाले आपण एकत्रच राहू! पप्पांना आला राग, काढली बंदूक आणि…

सावत्र भावांचं प्रेम पाहून वडिलांना राग अनावर! वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

सावत्र भाऊ, म्हणाले आपण एकत्रच राहू! पप्पांना आला राग, काढली बंदूक आणि...
धक्कादायक घटना
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 21, 2022 | 9:55 AM

सख्खा भाऊ पक्क वैरी, अशी म्हण प्रचलित आहे. पण मग सावत्र भावाचं काय? असा प्रश्न पडावा, अशी एक अजब घटना समोर आलीय. सावत्र भावांच्या एकत्र राहण्याच्या वडिलांना राग आला. या रागातून वडिलांनी (Father attacked on Son) आपल्याच मोठ्या मुलावर थेट गोळी झाडली. यात मुलगा गंभीर (Son Injured) जखमी झाला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनं एकच खळबळ माजलीय. सदरची घटना उत्तर प्रदेशच्या (UP Crime News) महोबा इथं घडलीय.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशच्या महोबा इथं एका वडिलांनी आपल्या मोठ्या मुलाला गोळ्या घातल्या. दिवसाढवळ्या वडिलांनी त्यांच्या लायसन्स बंदुकीतून गोळी झाडली आणि मुलावर जीवघेणा हल्ला केली. ही गोळी मुलाच्या पायाला लागली. यात गंभीर जखमी झालेल्या मुलाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. तर आरोपी वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांची चौकशी सुरु आहे.

आरोपी वडिलांनी सांगितलं की, त्यांना लहान मुलगा हा सावत्र भावासोबत एकत्र राहत होता. त्यांना एकत्र राहू नका, असं अनेकदा बजावलं होतं. पण तरिही त्यांनी ऐकलं नाही. आरोपी शिवनारायण शर्मा यांनी पोलिसांच्या तपासात ही माहिती दिली.

शिवनारायण शर्मा यांना दोन पत्नी आहेत. त्यांच्या पत्नीपासून सत्यनारायण नावाचा मोठा मुलगा झाला. तर दुसऱ्या पत्नीपासून सत्यदेव हा दुसरा मुलगा झाला. शिवनारायण यांची पहिली पत्नी घर सोडून गेली आणि ती माहेरी राहू लागली. स्वतः शिवनारायण हे आपल्या दुसऱ्या पत्नीसह महौबा इथं राहतात.

दरम्यान, सत्यनारायण आणि सत्यदेव यांचा एकमेकांवर प्रचंड जीव आहे. ते एकत्रच राहत होते. असं करु नका म्हणून सांगूनही ते ऐकले नाहीत. त्यानंतर अखेर संतापलेल्या वडिलांनी आपल्या मोठ्या मुलाला गोळी मारली.

सध्या जखमी मुलगा रुग्णालयात असून डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. पोलिसांनी आरोपी पित्यासह त्यांची बंदुकही जप्त केली आहे. अधिक तपास पोलिसांकडून केला जातोय. ही घटना समोर आल्यानं परिसरात एकच खळबळ माजलीय.