Uttar Pradesh | जमिनीच्या वादाने डोकं भडकलं, दिराने भावजयीच्या डोक्यात फावडा घातला; हत्येच्या घटनेने खळबळ

| Updated on: Oct 16, 2021 | 3:40 PM

उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील पोलीस स्टेशन परिसरातील औंच्छा भागात शनिवारी सकाळी एका महिलेची तिच्या दिराने फावड्याने हत्या केली. खुनाच्या या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण, तोपर्यंत आरोपी दीर तेथून पळून गेला होता. हत्येमागे जमिनीचा वाद असल्याची माहिती आहे, तर खुनाचा आरोप मृताच्या दिरावर आहे.

Uttar Pradesh | जमिनीच्या वादाने डोकं भडकलं, दिराने भावजयीच्या डोक्यात फावडा घातला; हत्येच्या घटनेने खळबळ
पत्नी व मुलाची हत्या करुन पतीची आत्महत्या
Follow us on

लखनौ : उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील पोलीस स्टेशन परिसरातील औंच्छा भागात शनिवारी सकाळी एका महिलेची तिच्या दिराने फावड्याने हत्या केली. खुनाच्या या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण, तोपर्यंत आरोपी दीर तेथून पळून गेला होता. हत्येमागे जमिनीचा वाद असल्याची माहिती आहे, तर खुनाचा आरोप मृताच्या दिरावर आहे. किरकोळ वादातून दिराने ही हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, औंच्छा परिसरातील दलीपपूर गावातील रहिवासी घेमडीलाल यांची पत्नी रामवती (वय-50) शनिवारी सकाळी भात पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेली होती. रामवती दीर सर्वेश कुमारच्या शेतातील नाली साफ करत होती आणि ही गोष्ट दिराला आवडली नाही. तो वहिणीवर रागावला आणि त्याने वहिणीला साफ-सफाई करण्यास नकार दिला.

दिराकडून फावड्याने हल्ला

जेव्हा रामवतीने पिक सुकवण्याविषयी सांगितलं तेव्हा दीर तिच्याशी वाद घालू लागला आणि त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात सर्वेशने रामवतीवर फावड्याने हल्ला केला. या हल्ल्यात रामवतीचा जागीच मृत्यू झाला. खून केल्याल्यानंतर आरोपी सर्वेशने संधीचा फायदा घेत पळ ठोकला. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

चवदार सांभार बनवले नाही म्हणून तरुणाकडून आई आणि बहिणीची हत्या

कर्नाटकातील उत्तरा कन्नड (उत्तरा कन्नड) जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. चवदार सांबार बनवले नाही म्हणून एका तरुणाने आपल्या आई आणि बहिणीला निर्घृणपणे ठार मारले आहे. पार्वती नारायण हसलर आणि रम्या नारायण हसलर अशी मयत मायलेकींची नावे आहेत. तर मंजुनाथ नारायण हसलर असे आरोपी तरुणाचे नाव असून कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली आहे.

आरोपी मंजुनाथ हा मद्यपी असल्याचे पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले. तो अनेकदा घरात भांडणं करीत असे. बुधवारी, जेव्हा तो घरी पोहचला आणि जेवायला बसला, तेव्हा सांभर चवदार झाले नाही म्हणून त्याचे बहीण आणि आईशी भांडण झाले. या व्यतिरिक्त त्याच्या आईला कर्ज घेऊन त्याच्या बहिणीसाठी फोन खरेदी करायचा होता, यालाही त्याचा विरोध होता.

 संबंधित बातम्या :

पुण्यात 43 वर्षीय लेफ्टनंट कर्नल महिला मृतावस्थेत आढळली, आत्महत्येचा संशय

वर्चस्वाच्या वादातून यवतमाळमध्ये मोठा घातपात, दोघांची हत्या, सहा आरोपींना बेड्या