‘माझा बुग्गू जेवला का?’ बस्स, राधा देवीने हा एक मेसेज वाचला आणि घराचे वासे फिरले

दोघांचा सुखाने संसार चाललेला. एक दिवस राधा देवीच्या हाताला नवऱ्याचा मोबाईल लागला. मोबाईल ओपन होता. राधा देवीने चॅट वाचले. त्यात ‘बुग्गू लव यू’, ‘माझा बुग्गू जेवला का’ असे रोमँटिक मेसेज होते. राधा देवीने हे मेसेजेस वाचल्यानंतर त्या घराचे वासेच फिरले.

माझा बुग्गू जेवला का? बस्स, राधा देवीने हा एक मेसेज वाचला आणि घराचे वासे फिरले
husband extramarital affair
| Updated on: Sep 18, 2025 | 2:33 PM

विवाहबाह्य संबंध आजच्या तारखेला सामान्य बाब झाली आहे. अशाच एका प्रकरणात पत्नीने एक दिवस पतीचा मोबाइल चॅट पाहिला.मोबाइल ओपन होता. या चॅटमध्ये पतीने दुसऱ्या कुठल्यातरी महिलेला रोमँटिक मेसेज पाठवलेले. चॅट वाचताना पत्नी रागाने लालबुंद झाली. तिने पतीला त्या मेसेजचा जाब विचारला.प्रत्युत्तरात नवऱ्याने तिला भरपूर मारहाण केली. अखेरीस पत्नीने कंटाळून प्राण दिले. तिने विष प्राशन केलं. त्यात तिचा मृत्यू झाला. पतीवर अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे.

आता पत्नीच्या नातेवाईकांनी पती विरोधात तक्रार नोंदवली आहे. प्रकरण नौबस्ता पोलीस ठाणे क्षेत्रातील राजीव नगरच आहे. इथे राहणारे मुकेश दुबे पेशाने एक पेन्सिल कंपनीत मॅनेजर आहेत.त्यांचं लग्न जवळपास 14 वर्षांपूर्वी रसूलाबाद येथे राहणाऱ्या राधा देवीशी झालं होतं. त्या आता 38 वर्षांच्या होत्या. या जोडप्याला दोन मुलं आहेत.राधा देवीचे भाऊ योगेश तिवारी यांनी सोमवारी रात्री भाचीला फोन करुन सांगितलं की, आईने विषारी पदार्थ खाल्लाय. नातेवाईक तिला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले.सर्व रुग्णालयांनी राधा देवींची स्थिती गंभीर असल्याच सांगितलं. अखेरीस सीसीआर रुग्णालयातील डॉक्टरांनी राधा देवींना मृत घोषित केलं.

‘बुग्गू लव यू’

मुकेश दुबे यांचे दुसऱ्या महिलसोबत चॅटिंग सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर जोडप्यामध्ये वाद वाढत गेला, असा आरोप नातेवाईकांनी केला. योगेश तिवारी यांनी सांगितलं की, राधा देवीने पतीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत त्याचं चॅटिंग सुरु असल्याच पाहिलं होतं. चॅटमध्ये लिहिलेलं. ‘बुग्गू लव यू’, ‘माझा बुग्गू जेवला का’ असे रोमँटिक मेसेज होते. हे मेसेज वाचल्यानंतर नाराज झालेल्या राधा देवी यांनी मुकेश यांच्याकडे विचारणा केली. त्यानंतर त्यांच्या वादविवाद आणि मारहाणीचा सिलसिला सुरु झाला.

मुकेश आपल्या सवयी सोडत नव्हता

मुकेशचे अन्य महिलांसोबत संबंध होते,त्याला राधा देवींचा विरोध होता. याच मुद्यावरुन दोघांमध्ये अनेकदा मारहाण झाली होती, असा पत्नीच्या नातेवाईकांचा आरोप आहे. अनेकदा समजावूनही मुकेश आपल्या सवयी सोडत नव्हता. यावेळी चॅट वाचल्यानंतर दोघांमध्ये भरपूर भांडण झालं. पोलिसांनी विषयाची गंभीरता लक्षात घेऊन तपास सुरु केला आहे. मोबाइल चॅटिंगच सर्व सत्य शोधून काढण्यासाठी डिजिटल फॉरेंसिक तपास केला जाईल. मृतकाच्या नातेवाईकांची विस्तृत जबानी नोंदवली जात आहे. आरोपी मुकेश विरोधात तक्रारीच्या आधारावर आवश्यक कारवाई केली जाईल.