भीषण VIDEO | कावड यात्रेला गाडीचा धक्का, यात्रेकरुंची चालकाला बेदम मारहाण, कारही फोडली

| Updated on: Feb 24, 2022 | 7:10 AM

कावड यात्रेला धक्का लागल्याच्या वादातून यात्रेकरुंनी कारची तोडफोड केल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. काठीने या गाडीच्या काचा फोडत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

भीषण VIDEO | कावड यात्रेला गाडीचा धक्का, यात्रेकरुंची चालकाला बेदम मारहाण, कारही फोडली
कावड यात्रेला धक्का लागल्याने गाडीची तोडफोड
Follow us on

लखनौ : रस्त्याने निघालेल्या कावड यात्रेला (Kavad Yatra) गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर कावड यात्रा वाहणाऱ्या यात्रेकरुंनी कार चालकाला काठीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतक्यावरच न थांबता यात्रेकरुंनी गाडीचीही तोडफोड (Car Vandalize) केल्याची धक्कादायक माहिती आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये (Lucknow Uttar Pradesh) आलम नगर फ्लायओव्हर जवळ हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या भीषण प्रकारामुळे एकच दहशत पसरली आहे. सोशल मीडियावर या प्रकरणावरुन दोन गट पडल्याचं चित्र आहे.

नेमकं काय घडलं?

कावड यात्रेला धक्का लागल्याच्या वादातून यात्रेकरुंनी कारची तोडफोड केल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. काठीने या गाडीच्या काचा फोडत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यात्रेकरुंनी गाडीच्या ड्रायव्हरलाही काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

पत्रकार प्रज्ञा मिश्रा यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजून 28 मिनिटांनी त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे मध्यरात्र ते पहाट अशा जेमतेम सहा तासांच्या काळातच या व्हिडीओला 86 हजारांहून अधिक व्ह्यूज, 1600 हून अधिक रिट्वीट्स मिळाले आहेत.

उत्तर प्रदेशात रात्रीची घटना

उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये आलम नगर फ्लायओव्हर जवळ हा प्रकार घडल्याची माहिती त्यांनी दिली आहे. काही वेळा पूर्वी हा प्रकार घडल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं असलं, तरी ‘टीव्ही9 मराठी’ने या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिलेली नाही.

सोशल मीडियावर दोन गट

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. अशा प्रकारच्या घटना दर काही दिवसांनी घडत असल्याचा दावा काही स्थानिक ट्विटराईट्सनी केला आहे. काही जणांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तर अनेक वाहन चालकांमध्ये या घटनेमुळे घबराट पसरली आहे. तर काही ट्विटर यूझर्सनी या प्रकाराचं समर्थनही केल्याचं पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड, बिबवेवाडीत कारवर सिमेंट ब्लॉक टाकणारे दोन गुंड अटकेत

VIDEO | चाहत्याची मिठी सुपरस्टार Pawan Kalyan यांच्या अंगलट, धावत्या कारखाली येताना थोडक्यात वाचले

दैव बलवत्तर म्हणून अपघातातून 5 शिक्षक बचावले, कंटेनरखाली कार घुसल्याने झाला अपघात