
एका मुस्लिम युवकाने हिंदू असल्याच सांगून लग्न केलं. ज्याला ती पती मानतेय, त्याने फसवून लग्न केलय. एका युवतीला 8 वर्ष हे सत्य समजलच नाही. पोलखोल झाली तेव्हा पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सर्व कहाणी सांगितली. या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला. सध्या आरोपीचा शोध सुरु आहे. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, ती रहीमाबादची सामाजिक कार्यकर्ती आहे. ब्लॉक स्तरावर महिलांसाठी पेन्शन आणि अन्य आवश्यक कागदपत्र बनवण्याचं काम करते. एक दिवस अनोळखी नंबरवरुन फोन आला. फोन करणाऱ्याने त्याचं नाव विवेक असल्याच सांगून पेन्शनची माहिती घेतली. त्यानंतर त्याचा फोन काही दिवसांच्या अंतराने चार ते पाच वेळ आला. त्याने भेटायला बोलावलं. मना केल्यानतंर दबाव टाकू लागला.
हरदोईच्या पिहानी दहेलियाचा राहणारा असल्याच त्याने सांगितलेलं. ट्रॅव्हल एजन्सीचा त्याचा व्यवसाय होता. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, स्वत:ला विवेक सांगणारा कमरुल हक पूजा करायचा. डोक्यावर टिळा लावायचा. हातात कलावा बांधायचा. म्हणून त्याच्यावर संशय आला नाही. त्याने याचा फायदा उचलला. लग्न झालेले असतानाही पुन्हा विवाह केला.
नंतर घरजावई बनला
युवती कमरुलची बहिण आणि तिच्या नवऱ्याबरोबर बोलली. त्यांनी सुद्धा कमरुलबद्दल सर्वकाही खोट सांगितलं. त्यानंतर कमरुलने माझ्यासोबत आर्य समाज मंदिरात 2017 साली लग्न केलं. दोन वर्ष आम्ही लखनऊला भाड्याच्या घरात राहत होतो. त्यानंतर करोना आला. मी त्याला हरदोईला जाऊन राहूया असं सांगितलं, तेव्हा त्याने टाळाटाळ केली. कोविडमध्ये धंदा बसल्याने हालत खराब झाल्याच कमरुलने सांगितलं. नंतर घरजावई बनून रहीमाबादमध्ये चार वर्ष राहिला.
युवतीला कसं समजलं तिची फसवणूक झालीय?
जास्तवेळ माहेरी राहिल्यामुळे मी त्याला हरदोईला घेऊन जायला सांगितलं. पुन्हा तो टाळाटाळ करु लागला. एकदिवस नोकरीचा कारण देऊन लखनऊनमध्ये राहू लागला. तो दीडवर्ष राहिला. कधी-कधी यायचा. मला येणं बंद केलं. फोन केल्यावर नोकरी गेल्याच त्याने सांगितलं. तो दिल्लीला निघून गेला. जवळपास वर्षभर तो गायब होता. मग नऊ जूनला त्याला शोधत-शोधत मी त्याच्या घरी गेली. मला समजलं की, त्याचं नाव कमरुल आहे. त्याचं लग्न झालय. त्याला मुलं आहेत. मी लगेच विरोध केला, त्यावेळी त्याच्या कुटुंबियांनी मला मारुन-मारुन पळवलं.