
लुटारु नवरीचे तुम्ही बरेच किस्से ऐकले असतील. अशी मुलींची एक टोळी असते, जी भोळ्या-भाबड्या मुलांना आपल्या जाळ्यात ओढते, त्यांच्याशी लग्न करतात. नंतर त्या मुलाच्या कुटुंबाला फसवून पळून जातात. अशा प्रकरणात अनेक मुलं समाजात बदनामी होईल म्हणून पोलिसात गुन्हा दाखल करत नाहीत. पण, अशी सुद्धा काही मुलं असतात, जी पुढे येऊन अशा प्रकरणात गुन्हा नोंदवतात. राजस्थानचा रहिवाशी ताराचंद जाटच्या दोन मुलांनी असच केलं. त्यांनी लुटारु नवरी विरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी अखेर वर्षभराने त्या नवरी मुलीला अटक केली.
या लुटारु नवरीचं नाव काजल आहे. दिसायला एकदम भोळी भाबडी असणाऱ्या काजलने अनेक मुलांना चुना लावला आहे. ती आपल्या खोट्या कुटुंबासोबत मिळून श्रीमंत मुलांना फसवायची. ज्या मुलांची लग्न जुळत नव्हती, त्यांना ती गाठायची. आता काजोल जेलमध्ये आहे. तिचे वडील भगत सिंह, आई सरोज, बहिण तमन्ना आणि भाऊ सूरज यांना आधीच अटक करण्यात आली आहे. काजोल मागच्यावर्षीपासून पोलिसांना चकवा देऊन सतत लोकेशन बदलत होती. तिला हरिणायाच्या गुरुग्राममधून अटक करण्यात आली.
लग्नाच्या तयारीसाठी किती लाख घेतले?
26 नोव्हेंबर 2024 रोजी सीकर जिल्ह्यातील ताराचंद जाट यांच्या दोन मुलांनी एकत्र येऊन तक्रार नोंदवली. ताराचंद यांची जयपूरमध्ये भगत सिंह यांच्यासोबत भेट झाली. भगत सिंह यांना दोन मुली आहेत, काजल आणि तमन्ना. त्यांनी ताराचंद यांच्यासमोर त्यांचे दोन मुलगे भंवर लाल आणि शंकर लाल यांच्यासोबत लग्नाचा लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला. भगत सिंह यांनी लग्नाच्या तयारीच्या नावाखाली ताराचंद यांच्याकडून 11 लाख रुपये घेतले.
धूमधडाक्यात लग्न लावून दिलं
ताराचंद यांनी भगत सिंह यांच्यावर विश्वास ठेऊन एवढी मोठी रक्कम दिली. लग्नाचा खर्च आणि अन्य तयारीसाठी हा पैसा दिलेला. 21 मे 2024 रोजी गोविंद रुग्णालयाच्या गेस्ट हाऊसमध्ये भगत सिंह पत्नी सरोज, मुलगा सूरज आणि दोन मुली काजल, तमन्नासह पोहोचले. तिथे धूमधडाक्यात ताराचंद यांच्या दोन मुलांसोबत लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर दोन दिवस भगत सिंह यांचं कुटुंब ताराचंद यांच्यासोबत राहत होतं.
लग्नासाठी कशी मुलं शोधायचे?
तिसऱ्या दिवशी अचानक हे लोक नवरीचे दागिने, रोख रक्कम आणि कपडे घेऊन पसार झाले. ताराचंद आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा मोठा झटका होता. ताराचंद यांचं फक्त आर्थिक नुकसानच झालं नाही, तर सामाजिक अपमानाचा सुद्धा सामना करावा लागला. काजलने अटक झाल्यानंतर पोलिसांना सांगितलं की, तिचे वडिल भगत सिंह यांचं फसवणूक करण्याचं एक सुनियोजित नेटवर्क होतं. ते आपल्या दोन्ही मुली कुमारीका असल्याच भासवून त्यांच्यासाठी स्थळ शोधायचे. ज्या मुलांची लग्न ठरत नाहीयत, पण त्यांच्याकडे पैशांची कमी नाही अशी घर शोधायचे.
नवऱ्या मुलाशी संबंध ठेवायच्या का?
मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा सह अन्य राज्यांमध्ये सक्रीय होती. काजल आणि तमन्ना यांची यामध्ये मुख्य भूमिका होती. कारण त्यांचं लग्न लावून समोरच्याचा विश्वास जिंकायचे. लग्नाचे दोन तीन दिवस विधींमध्ये जायचे. यामुळे पतीसोबत संबंध ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.