
नात्यांवरील विश्वास उडावा अशी एक घटना समोर आलीय. समाजासाठी सुद्धा हा एक धक्का आहे. डिलारी पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. एका नवविवाहितेने आपल्या सासरच्या माणसांचा जीव धोक्यात घालून आपल्या घरातच चोरी केली. सात जन्म साथ निभावण्याची शपथ घेणाऱ्या या नवरी मुलीने डिनर नंतर अर्ध्या रात्री पती, सासू, सासरा आणि नणदेला नशा असलेलं दूध पाजून बेशुद्ध केलं. सगळा परिवार निपचित झाल्यानंतर आरोपी नवरी मुलीने घरात ठेवलेली एका लाख रुपयांची रोकड आणि लाखो रुपयाचे दागिने घेऊन प्रियकरासोबत पसार झाली. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जनपदमध्ये ही घटना घडली आहे.
पीडित पतीने या घटनेची पोलीसात तक्रार केली आहे. साहेब वर्षभरापूर्नवी छजलैट येथील किरनपुर गावात राहणाऱ्या युवतीसोबत माझं धूमधडाक्यात लग्न झालं होतं. पतीच्या आरोपानुसार लग्नाच्या आधी पत्नीचे हरविंदर नावाच्या युवकासोबत प्रेम संबंध होते. निकाहनंतर ते संबंध कायम होते. पतीने तिला अनेकदा तिच्या प्रियकरासोबत पकडलं. तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीने सुधारण्याऐवजी संपूर्ण कुटुंबालाच मार्गातून हटवण्याचा कट रचला.
पायाखालची जमीनच सरकली
10 मार्चच्या रात्री तिने किचनमध्ये ठेवलेल्या दुधात नशेचा पदार्थ मिसळला. दूध पिल्यानंतर संपूर्ण कुटुंब गाढ झोपून गेलं. त्यानंतर ती घरात चोरी करुन पसार झाली. घटनेच्या दुसऱ्यादिवशी दुपारपर्यंत घरात सन्नाटा होता. शेजाऱ्यांना काहीतरी अघटित घडलय असं वाटलं. त्यांनी कुटुंबियांना जाग केलं. शुद्धीत आल्यानंतर समोरच दृश्य बघून पीडित कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. सगळं कपाट रिकामी होतं. सून गायब होती. पीडित पतीचा आरोप आहे की, पत्नी त्याला अनेकदा खोट्या प्रकरणात फसवायची धमकी द्यायची.
पोलिसांनी काय कारवाई केली?
पोलिसांनी पीडित पतीच्या तक्रारीवरुन प्रियकर हरविंदर विरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांची विशेष टीम टेक्निकल सर्विलांस आणि खबऱ्यांच्या मदतीने फरार जोडप्याच्या शोधात संभाव्य ठिकाणी छापेमारीची कारवाई करत आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, लवकरच आरोपींना अटक करुन कायदेशीर कारवाई केली जाईल.