Raja Raghuvanshi Murder : राजा, राज आणि रेकी… सोनमनंतर आता मारेकऱ्यांच्या ट्रेकिंगचाही व्हिडीओ समोर

शिलाँगमध्ये ट्रेकिंग करणाऱ्या सोनम आणि राजा रघुंवशीपाठोपाठ आता त्या मारेकऱ्यांचा व्हिडीओही समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर एका युजरने हा व्हिडीओ काल शेअर केला होता, त्यापाठोपाठ त्याने दुसरा व्हिडीओही पोस्ट केला ज्यामध्ये 3 मारेकरी दिसले. त्यात विशाल हा सर्वात पुढे चालताना दिसला तर त्याच्यामागोमाग आनंद आणि त्याचे पाठी आकाश राजपूत दिसला. तिघांच्याही हातात एकेक काठीही होती.

Raja Raghuvanshi Murder : राजा, राज आणि रेकी... सोनमनंतर आता मारेकऱ्यांच्या ट्रेकिंगचाही व्हिडीओ समोर
राजा रघुवंशीच्या मारेकऱ्यांचा व्हिडीओही समोर
Image Credit source: social media
| Updated on: Jun 17, 2025 | 8:44 AM

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या इंदौरच्या राजा रघुवंशी हत्याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून आता काही व्हिडीओही समोर येताना दिसत आहेत. कालच सोनम आणि राजा यांच्या ट्रेकिंगचा व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये पांढरा शर्ट घातलेली सोनम पुढे तर पांढऱ्यांच रंगाचा स्लीव्हलेस टीशर्ट घालून राजा तिच्यामागे चालत ट्रेकिंग करताना दिसला होता. आता त्यापाठोपाच राजाच्या मारेकऱ्यांचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. राजाची हत्या करण्याच्या काही काळ आधीचा हा व्हिडीओ असून त्यामध्ये विशाल उर्फ विक्की ठाकुर, आनंद कुर्मी और आकाश राजपूत हे तिघेही कॅप्चर झालेत. विशालनेच राजावर पहिला वार केला होता. त्यानंतर आनंद आणि आकाशसोबत मिळून त्याने त्याची हत्या केली. एवढं सगळं होत असताना, आपल्याच पतीला तिघे मारत असताना सोनम तिथेच शेजारी सगळं थंडपणे पाहत उभी होती.

खरंतर, हा व्हिडिओ 23 मे रोजी दुपारी 2 वाजण्यापूर्वीचा आहे, त्याच दिवशी राजाचा खून झाला होता. राजावर पहिल्यांदा हल्ला करणारा आरोपी विशाल हा हत्येपूर्वी किती निडर होता, हे त्याच्या डोळ्यांवरून समजू शकतं. सोनमने दिलेल्या सूचनेनुसार ते थोडे पुढेच चालत होते. मग त्यांनी एका ठिकाणी थांबून राजा रघुवंशी याची हत्या केली आणि मृतदेह दरीत फेकून ते पसार झाले.

23 मेला झाली निर्घृण हत्या

राजा रघुवंशी याच्या हत्येत वापरलेल्या शस्त्राचा फोटो समोर आला आहे. आरोपींनी हे शस्त्र 19 मे रोजी आसाममधील गुवाहाटी रेल्वे स्थानकाच्या बाहेरून खरेदी केले होते. त्यानंतर तेथून हे लोक शिलाँगला रवाना झाले. 23 मे रोजी आरोपींनी राजा रघुवंशीची निर्घृणपणे हत्या केली होती. अखेर 17 दिवसांनी सर्व आरोपींना एकामागोमाग एक अशी अटक करण्यात आली. शिलाँग पोलिसांनी सोनम रघुवंशी, राज कुशवाह, विशाल उर्फ ​​विक्की ठाकूर, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत यांच्यासह एकूण पाच आरोपींना अटक केली होती.

 

राजा रघुवंशी याची पत्नी आणि या हत्याकांडाची प्रमुख मास्टरमाईंड सोनम रघुवंशीला 8 जूनच्या रात्री उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील एका ढाब्यातून अटक करण्यात आली, तर राज आणि विशालला इंदौर येथून अटक करण्यात आली. आनंद कुर्मीला मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून, तर आकाश राजपूतला उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. सध्या हे पाचही जण शिलाँग पोलिसांच्या ताब्यात आहेत. या हत्येबाबत पोलिस त्यांची कसूनचौकशी करत आहेत. या प्रकरणात ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल केले जाईल, असे शिलाँगच्या एसपींनी सांगितलं.

 

मारेकऱ्यांच्याही ट्रेकिंगचा व्हिडीओ समोर

शिलाँगच्या टेकड्यांमध्येवर ट्रेकिंग करणाऱ्या तिन्ही आरोपींचा व्हिडीओ समोर आला असून त्यात विशाल सर्वातपुढे चालताना दिसत आहे, तर आनंद त्याच्या मागे आहे, त्यापाठोपाठी आकाश राजपूत दिसतो. तिघांनीही हातात काठ्या धरल्या होत्या. क्रूर हत्याकांडापूर्वी तिघांपैकी कोणाच्याही डोळ्यात भीती दिसलीच नाही. ते एखाद्या सामान्य पर्यटकाप्रमाणे फिरताना दिसले. पुढे जाऊन ते इतक भयानक, क्रूर कृत्य करतील याची कोणालाही पुसटशीदेखील कल्पना नव्हती.