AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राणी मुखर्जीचा ‘मर्दानी 3’ हिट की फ्लॉप? संपूर्ण बॉक्स ऑफिस रिपोर्ट पहा..

अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'मर्दानी 3' हा चित्रपट हिट झाला की फ्लॉप, हे जाणून घेण्यासाठी त्याचा संपूर्ण बॉक्स ऑफिस रिपोर्ट एकदा पहा. गेल्या अकरा दिवसांत या चित्रपटाने किती कमाई केली आणि या चित्रपटाचा बजेट किती होती, त्याबद्दलचा हा संपूर्ण रिपोर्ट..

राणी मुखर्जीचा 'मर्दानी 3' हिट की फ्लॉप? संपूर्ण बॉक्स ऑफिस रिपोर्ट पहा..
Mardaani 3 Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 10, 2026 | 1:40 PM
Share

‘मर्दानी’ फ्रँचाइजीच्या चित्रपटांमध्ये पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारून अभिनेत्री राणी मुखर्जीने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. या फ्रँचाइजीमधील तिसरा भाग नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘मर्दानी 3’ या चित्रपटासह राणी मुखर्जीने थिएटरमध्ये जबरदस्त कमबॅक केलं आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा पोलीस अधिकारी शिवानी रॉयची भूमिका साकारून राणीने कौतुक मिळवलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. ‘मर्दानी 3’ची सुरुवात जरी ठीकठाक झाली असली तरी दुसऱ्या वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाल्याचं पहायला मिळालं.

‘मर्दानी 3’ची अकराव्या दिवसाची कमाई

‘मर्दानी 3’ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’कडून तगडी टक्कर असतानाही राणीचा हा चित्रपट समाधानकारक कमाई करतोय. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 26.3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी ‘मर्दानी 3’ची कमाई 1.85 कोटी, दुसऱ्या शनिवारी 3.5 कोटी आणि दुसऱ्या रविवारी 4.25 कोटी रुपये इतकी होती. दुसऱ्या वीकेंडला जरी या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली असली तरी दुसऱ्या सोमवारी मात्र कलेक्शनचा वेग थोडा कमी झाला. प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशी कमाईच्या आकड्यात बरीच घट पहायला मिळाली.

‘सॅकनिल्क’ या बॉक्स ऑफिस कलेक्शन ट्रॅकरने दिलेल्या माहितीनुसार, ‘मर्दानी 3’ने प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या सोमवारी फक्त 1.15 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाच्या कमाईचा एकूण आकडा 37.05 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

बजेटच्या तुलनेत किती कमाई?

‘कोईमोई’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी 3’चा बजेट जवळपास 60 कोटी रुपयांचा आहे. प्रदर्शनाच्या 11 दिवसांत या चित्रपटाने 37.05 कोटी रुपये कमावून बजेटचा 61.67 टक्के वसूल केला आहे. संपूर्ण बजेट वसूल करण्यासाठी या चित्रपटाला आणखी 23 कोटी रुपये कमावण्याची गरज आहे. त्यानंतरच राणीचा हा चित्रपट ‘सेफ झोन’मध्ये येऊ शकेल. तरी बॉक्स ऑफिसवर हिट ठरण्यासाठी या चित्रपटाला बजेटपेक्षा 50 टक्के अधिक कमाई करावी लागेल.

राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेला क्राइम थ्रिलर ‘मर्दानी 3’ हा चित्रपट 30 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये राणी मुखर्जीने अत्यंत पॉवरफुल आणि निडर व्यक्तिमत्त्व असलेल्या पोलीस अधिकारीची भूमिका साकारली आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ