Video : बांधाच्या वादावरुन दोघांना बेदम मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा; घटना कॅमेरात कैद

4 मार्चला स्वप्नील शिरकांडे आणि मच्छिंद्र शिरकांडे हे जमिनीचा बांध फोडत असताना धोंडीराम शिरकांडे आणि बाळासाहेब शिरकांडे समजावून सांगत होते. मात्र बांधाच्या वादावरुन सहा जणांनी धोंडीराम शिरकांडे आणि बाळासाहेब शिरकांडे याना मारहाण केली.

Video : बांधाच्या वादावरुन दोघांना बेदम मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा; घटना कॅमेरात कैद
शेतीच्या बांधावरुन दोन शेतकऱ्यांना मारहाण, 6 जणांविरोधात गुन्हा
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 7:24 PM

सांगली : शेतीच्या बांधावरुन भावभावकीतील वाद अनेकदा पाहायला मिळतात. कधी या वादाचं रुपांतर तुंबळ हाणामारीत (Beating) बनतं आणि मग पोलीस ठाण्याची (Police Station) पायरी चढली जाते. असाच एक वाद सांगलीच्या (Sangli) आटपाडी तालुक्यातील राजेवाडी शिवारात पाहायला मिळाला. शेतीच्या बांधाच्या वादावरुन दोघांना बेदम मारहाण करण्यात आलीय. मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झालाय. आटपाडी पोलीस ठाण्यात याबाबत सहा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.

नेमका प्रकार काय?

राजेवाडी शिवारात धोंडीराम शिरकांडे यांची 40 एकर जमीन आहे. त्यांच्याच बाजूला संदीप शिरकांडे यांची जमीन आहे. या दोघांमध्ये शेतीच्या बांधावरुन अनेक वर्षापासून वाद सुरु आहे. या प्रकरणात 2001 मध्ये न्यायालयात दावाही दाखल करण्यात आलाय. मात्र, 4 मार्चला स्वप्नील शिरकांडे आणि मच्छिंद्र शिरकांडे हे जमिनीचा बांध फोडत असताना धोंडीराम शिरकांडे आणि बाळासाहेब शिरकांडे समजावून सांगत होते. मात्र बांधाच्या वादावरुन सहा जणांनी धोंडीराम शिरकांडे आणि बाळासाहेब शिरकांडे याना मारहाण केली.

या मारहाणीचा व्हिडीओ धोंडीराम यांच्या मुलाने कॅमेरात कैद केला आहे. याप्रकरणी आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील शिरकांडे, मचिंद्र शिरकांडे, बाबुराव जगताप, महादेव जगताप, प्रशांत जगताप, दादासाहेब जगताप अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास आटपाडी पोलीस करत आहेत.

इतर बातम्या : 

‘उद्धव ठाकरे केवळ नावाला मुख्यमंत्री, कर्तृत्वाने नाही’, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

एसटी कामगारांना विलीनिकरण सदृश्य लाभ मिळणार?; अनिल परब करणार उद्या घोषणा

फडणवीसांच्या गंभीर आरोपानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब? कार्यालयालाही टाळं!