उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले

महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणं राज्य भरात शेतरस्ते समन्वयातून खुले केले जात आहेत. शेतकऱ्यांकडून देखील जुने वाद विसरून शेतररस्ते खुले करण्याचं काम सुरु आहे. farm roads

उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 11:48 PM

उस्मानाबाद: महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणं राज्य भरात शेतरस्ते समन्वयातून खुले केले जात आहेत. शेतकऱ्यांकडून देखील जुने वाद विसरून शेतररस्ते खुले करण्याचं काम सुरु आहे. शेतरस्ते झाल्यामुळे शेतकऱ्यासंमोरील अनेक अडचणी दूर होणार आहेत. शिवाय अनेक पिढ्यांपासून सुरु असलेले वाद संपुष्ठात येणार आहेत. सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत उस्मानाबाद जिल्ह्यात 150 किमी पेक्षा अधिक शेतरस्ते खुले करण्यात आले आहेत. (Osmanabad 150 km farm roads open after appeal of collector kaustubh diwegaonkar)

उस्मानाबादमध्ये 150 किमी पेक्षा अधिक रस्ते खुले

उस्मानाबाद जिल्ह्यात शेतरस्ते खुले करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांचे बांधावरचे वाद , रस्त्याच्या अडचणी मिटत आहेत. जिल्ह्यात जवळपास 150 किमी पेक्षा जास्त शेतरस्ते अतिक्रमण मुक्त केले आहेत. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी ही मोहीम हाती घेतली आहे.

3 महिन्यात 5 किमी शेतरस्त्याचे मातीकाम पूर्ण

उस्मानाबाद तालुक्यातील कावळेवाडी या गावात 5 किलोमीटर शेतरस्ताचे मातीकाम अवघ्या 3 महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे. यातील काही रस्त्यांचा वाद हा गेल्या दोन पिढ्यापासून सुरू होता. मात्र तो गावकर्‍यांनी एकत्र येत सामंजस्याने सोडविला असून तो आता कायमचा संपुष्टात आला आहे.

पिढ्यानं पिढ्यांचे बांधाचे वाद संपुष्टात

शेतरस्त्याचे मातीकाम लोकसहभागातुन पूर्ण झाले आहे. शेतकर्‍यांचा पिढ्यान्पिढ्याचा बांधाचा वाद संपुष्टात आले आहेत. शेतीसाठी पेरणीपासून काढणीपर्यंतचा मार्ग सुकर व्हावा य, साठी सर्व शेतकर्‍यांना विश्वासात घेवून शेतरस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलं आहे. गावकऱ्यांनी 5 कि.मी.चे शेतरस्ते तीन महिन्यात पूर्ण करुन दाखवत गावाच्या नावाचा डंका कावळेवाडी गावानं वाजवला आहे.

75 ते 100 मिमी पावसाशिवाय पेरणी करु नका

गेल्या काही दिसांपासून सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस देखील पडत आहे. यंदाचा उन्हाळा देखील एवढा जाणवला नाही आणि लगेच मॉन्सून देखील आला. निसर्गाच्या या खेळात शेतकऱ्यांचे मात्र अनेक वेळा हाल होतात तर कधी मदतही होते.  सध्या शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, राज्यभरात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कृषी विभागाने  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना केली आहे. शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

यवतमाळ येथे 25 लाखांचे परवानगी नसलेले बिटी बियाणे जप्त; पोलीस व कृषी विभागाची कारवाई

बार्शीच्या शेतकऱ्याची दुष्काळावर मात, खजूर शेतीतून लाखोंची कमाई, राजेंद्र देशमुख यांची प्रेरणादायी यशोगाथा नक्की वाचा

(Osmanabad 150 km farm roads open after appeal of collector Kaustubh Diwegaonkar)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.