रात्रीच्या वेळी अल्पवयीन भाच्यासोबत गाडीवरुन यायच्या, कारनामा करुन पळून जायच्या; काय घडले नक्की?

| Updated on: Apr 05, 2023 | 9:27 AM

मामी-भाची आणि अल्पवयीन भाचा रात्रीच्या वेळी अॅक्टिव्हावरुन यायच्या. परिसरात फिरुन कारनामा करुन पळून यायच्या. मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याने या मामी-भाचीला तुरुंगात पोहचवले.

रात्रीच्या वेळी अल्पवयीन भाच्यासोबत गाडीवरुन यायच्या, कारनामा करुन पळून जायच्या; काय घडले नक्की?
कारमधील साऊंड सिस्टिम चोरणाऱ्या मामी-भाचीला अटक
Image Credit source: TV9
Follow us on

विरार / विजय गायकवाड : रात्रीच्या वेळी पार्क केलेल्या महागड्या गाड्यांमधील साऊंड सिस्टिम चोरणाऱ्या मामी-भाचीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मामी-भाचीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. विरार गुन्हे शाखा कक्ष 3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने ही कारवाई केली. सरिता गणेश लिंगम आणि अंजू मुकेश वधाणी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी मामी-भाचीची नावे आहेत. या मामी-भाचीने आतापर्यंत किती गाड्यांच्या साऊंड सिस्टिम चोरल्या आहेत, याची पोलीस चौकशी करत आहेत.

महागड्या कारमधील साऊंड सिस्टिम चोरायच्या

वसई, विरार, नालासोपारा परिसरात पार्किंग केलेल्या, सार्वजनिक ठिकाणी उभ्या केलेल्या महागड्या कारमधील साऊंड सिस्टम चोरी करायच्या. या गुन्ह्यात अल्पवयीन भाच्याचाही सहभाग आहे. आरोपी मामी-भाची या नालासोपारा पूर्व बिलालपाडा रोड हवाईपाडा परिसरातील रहिवासी असून, मूळच्या चेन्नईच्या राहणाऱ्या आहेत. यातील सरिता ही मामी आहे तर अंजू ही भाची आहे. अंजुचा 17 वर्षांचा भाऊ ही यातील आरोपी आहे.

आरोपींकडून सहा गुन्ह्यांची उकल

या आरोपींकडून एक अॅक्टिव्हा, चोरी केलेले 6 म्युझिक सिस्टम असा 1 लाख 6 हजार 550 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विरार, अर्नाळा आणि तुळिंज येथील 6 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. पोलिसांना संशय येऊ नये यासाठी मामी-भाची अल्पवयीन भाच्याला अॅक्टिव्हा गाडीवर बसवून, मोठ्या सराईतपणे चोरी करून फरार होत होत्या. पण यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद झाल्याने त्या पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या आहेत. सध्या मामी-भाची ह्या दोघी विरार पोलिसांच्या ताब्यात असून, पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा