
दिर आणि वहिनीचे नाते आई-मुलासारखे किंवा मित्र- मैत्रिणीसारखे असते. पण काही लोक या नात्याला कलंक लावण्यात काहीच कसर सोडत नाहीत. उत्तर प्रदेशातील बस्ती येथून असाच एक प्रकार समोर आला आहे. एका विधवा महिलेने आरोप केला आहे की, तिचा दिर तिच्यासमोर अश्लील कृत्य करायचा. जेव्हा वहिनीने याची तक्रार सासू-सासऱ्यांकडे केली, तेव्हा त्यांनी तिला असे उत्तर दिले की, तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन तिघांविरुद्ध खटला दाखल केला.
हा प्रकार मुंडेरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे एका विधवा महिलेने दिर, सासू आणि सासऱ्यांवर गंभीर आरोप करत खटला दाखल केला आहे. महिलेने पोलिसांना आपली आपबीती सांगितली. ती म्हणाली, “मी माझ्या मुलीसोबत बेडरूममध्ये बसले होते. दिर आला आणि माझ्याशी छेडछाड करू लागला. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. तेव्हा मी ओरडले. सासू-सासरेही खोलीत आले. मी त्यांना दिराच्या कृत्याबद्दल सांगितले. तेव्हा दोघांनीही म्हटले, ‘याची मागणी मान्य कर. हा जे करतोय, ते करू दे. नाहीतर आम्ही तुला मारून टाकू.’” विधवा वहिनीचा असा दावा आहे की, तिच्या पतीने तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. तेव्हापासून दिर तिच्यावर लग्नाचा दबाव टाकत होता.
वाचा: मला प्रेताशी शारिरीक संबंध ठेवायला मजा येते; 30 मुलींवर अत्याचार करणारा हैवान कसा पकडला गेला?
पतीचा मृत्यू झाला आहे
या प्रकरणात पोलिस प्रदीप कुमार सिंह यांनी सांगितले की, विधवा महिलेच्या तक्रारीच्या आधारावर दिरासह तिघांविरुद्ध खटला दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. मुंडेरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तक्रारदार महिलेने तक्रारीत सांगितले की, तिच्या पतीचा मृत्यू २०२२ मध्ये झाला होता. त्याने आत्महत्या केली होती. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. त्या खटल्यातून ती निर्दोष सुटली आहे.
२७ जुलैची आहे घटना
महिलेचा आरोप आहे की, २७ जुलै रोजी मी माझ्या मुलीसोबत बेडरूममध्ये बसले होते. याचवेळी दिर माझ्या खोलीत आला. तो म्हणाला, “तू माझ्याशी लग्न कर.” याच मुद्द्यावरून दिराने चुकीच्या हेतूने माझ्याशी छेडछाड सुरू केली. विरोध केल्यावर माझ्या उजव्या हाताची बांगडी तुटली आणि हातातून रक्त वाहू लागले. ओरडण्याचा आवाज ऐकून सासरे आणि सासू घटनास्थळी पोहोचले. दोघांनीही म्हटले, दिराची मागणी मान्य कर, नाहीतर तुझी हत्या करून आम्ही ती आत्महत्या दाखवून सुटून जाऊ.” या प्रकरणी दिरासह सासू आणि सासऱ्यांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. तसेट एसआय मुरलीधर मिश्रा यांना सोपवण्यात आला आहे.