पत्नीने इन्स्टाग्रामवर शोधली पतीसाठी गर्लफ्रेंड, लग्नही झाले, मग तिने… ऐकून पोलिसही चक्रावले

एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका घटस्फोटीत महिलेने विवाहीत पुरुषाशी लग्न केले होते. पण लग्नानंतर जे सत्य समोर आले ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

पत्नीने इन्स्टाग्रामवर शोधली पतीसाठी गर्लफ्रेंड, लग्नही झाले, मग तिने... ऐकून पोलिसही चक्रावले
Crime
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 18, 2025 | 4:17 PM

उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एका घटस्फोटीत महिलेला फसवून तिच्याशी लग्न करण्याचा प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर प्रेमाचे नाटक करून तिच्याशी लग्न केले. नंतर कळले की, तो तरुण आधीच विवाहित आहे. आरोपी तरुण आणि त्याच्या पत्नीने मिळून तिला जाळ्यात अडकवले. तिची रोख रक्कम आणि दागिने हडप केले. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गाझीपूर कोतवाली परिसरातील एका घटस्फोटीत महिलेची ओळख फेसबुक आणि इन्स्टाग्रामद्वारे पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील अमित पासवान याच्याशी झाली. त्याने स्वत:ला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. नंतर त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तिचा विश्वास संपादन करून तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण सुरू केले. काही काळाने त्याने त्या महिलेशी लग्नही केले.
वाचा: हॉटेलमध्ये भेटायला गेला… पत्नीच निघाली गर्लफ्रेंड; पतीचे सत्य आले समोर

पीडिता सरकारी खात्यात नोकरी करते

पीडित महिला सरकारी खात्यात नोकरी करते. तिला नंतर कळले की, ज्या तरुणाशी तिने लग्न केले, तो आधीच विवाहित आहे. खुलासा झाला की, हे पती-पत्नी मिळून अशा अनेक मुलींना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांची रोख रक्कम व दागिने हडपतात. पीडित महिलेला दोन मुलीही आहेत. ती नेहमी फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा वापर करायची.

पश्चिम बंगालच्या तरुणाशी झाली मैत्री

याच दरम्यान, फेसबुक आणि इन्स्टाग्रामद्वारे अमित पासवान नावाचा तरुण तिच्या संपर्कात आला. त्याने स्वत:ला सीबीआय अधिकारी सांगत तिच्यावर प्रभाव टाकला आणि त्या घटस्फोटीत महिलेला लग्नाचा प्रस्ताव ठेवला. एकटेपणामुळे तणावात असलेल्या त्या महिलेनेही या प्रस्तावाला होकार दिला.

दोघांनी केले लग्न, मग झाला खुलासा

27 मार्च 2023 रोजी दोघांनी लग्न केले. पण लग्नानंतर कळले की, तो तरुण आधीच विवाहित आहे. त्याची पत्नी बांदा जिल्ह्यात राहते. यानंतर महिलेने त्याच्या पत्नीची भेट घेतली. तिने स्वत:ला अमितची पत्नी सांगत पीडित महिलेला शिवीगाळ केली. कळले की, हा तरुण आणि त्याची पत्नी मिळून अनेक मुलींना आपल्या जाळ्यात अडकवतात.

हडपली रोख रक्कम आणि दागिने

पीडित महिला सरकारी खात्यात कर्मचारी आहे, त्यामुळे या तरुण आणि त्याच्या पत्नीने आधी तिला आपल्या जाळ्यात अडकवले आणि नंतर तिचे सर्व पैसे व दागिने हडप केले. महिलेने अमित पासवानशी आपले संबंध तोडले. तरीही अमित आणि त्याच्या पत्नीने फोनवरून तिला शिवीगाळ करत त्रास देणे सुरू ठेवले. पोलिसांनी आता पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी तरुण अमित पासवान आणि त्याची पत्नी राम जानकी देवी यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.