AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डेंजर पत्नी… पतीच्या मृतदेहा शेजारीच केला मेकअप, बिअर पिऊन नाचली आणि..

आरोपी पत्नीने पतीचा जीव घेला, धक्कादायक गोष्ट म्हणजे नंतर त्याच खोलीत मेकअप केला. आणि खाली जाऊन दारू पिऊन ती वरातीत नाचलीदेखील. या हत्याकांडामुळे अख्खं गाव हादरलं आहे.

डेंजर पत्नी... पतीच्या मृतदेहा शेजारीच केला मेकअप, बिअर पिऊन नाचली आणि..
पतीला मारू, त्याच्या बॉडीशेजारीच केला मेकअप...
| Updated on: Feb 03, 2026 | 11:35 AM
Share

पती-पत्नीचं नातं 7 जन्मांच असतात असं म्हणतात, पण मध्यप्रदेषच्या झाबुआतील खळबळजनक हत्यांकांडाने पती-पत्नीच्या नात्यावरचा विश्वासच उडेल. त्या हत्येने अख्ख गाव हादरलंय. सोशल मीडियावर रील बनवण्याच्या वादातून पतीची हत्या करून, पत्नी त्यानंतर जे वागली त्यामुळे सगळेच हैराण झाले. आता याप्रकरणात आणखी 1 नवा खुलासा झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, हत्येनंतर आरोपी पत्नीने तिच्या पतीच्या मृतदेहाजवळ बसून मेकअप केला, नंतर ती बिअर प्यायली आणि नाचली देखील. पत्नीचे बिअर पिऊन नाचतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

खरंतर हे प्रकरण थंडला पोलिस स्टेशन हद्दीतील नरेला गावातील आहे. या गावातील रहिवासी कैलास (25) याचे लग्न जून 2025 मध्ये झाले होते. हे नवीन नातं घरात आनंद आणेल,अशी कुटुंबाला आशा होती. पण याचं लग्नामुळे एवढं मोठं दुःख मिळेल असा कोणीच विचार केला नव्हता.

घरात चुलतभावाचं लग्न

हे हत्याकांड 28 जानेवारीला घडलं. त्याच दिवशी, त्यांच्याकडे कैलासचा काका, थावर सिंग यांच्या मुलाचा, बंटीचा विवाह होता, त्याचीच तयारी सुरू होती. त्यादरम्यान, कैलासची मोठी बहीण, लीला, त्याला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत आली. वारंवार हाक मारून आणि ब्लँकेट ओढनूह कैलास उठला नाही तेव्हा तिने त्याला हलवल, मात्र त्याचे पाय थंड आणि कडक होते. घाबरून तिने तिच्या कुटुंबियांना हाक मारली,तेव्हासग्यांना कळलं की कैलासचा मृत्यू झाला आहे.

गळा दाबून केली हत्या

कैलासच्या पत्नीनेच दोरीने गळा दाबून त्याचा खून केला होता असं तपासात उघड झालं. हत्येनंतर आरोपी पत्नीने लग्नात मिळालेल्या नवीन कपाटात ती दोरी लपवली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पत्नीला ताब्यात घेतले. ती अल्पवयीन असून याप्रकरणात तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं.

पतीच्या मृतदेहाजवळच केला मेकअप

मात्र, या हत्येतील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, पतील मारल्यावर ती घाबरली नाही, उलट पतीचा मृतदेह घरात पडला असूनही, ती महिला तिथेच उभी राहिली आणि तिने तिचा मेकअप केला. साडी नेसण्यासाठी तिने भाचीची मदत घेतली. जेव्हा त्या भाचीने कैलासला उठवण्याचा सल्ला दिला तेव्हा महिलेने नकार दिला, कैलासने स्वतः उठवण्यास नकार दिल्याचं सांगत तो लग्नाच्या वरातीत सामील होणार नाही असंही ती म्हणाली. यानंतर, आरोपी पत्नी घराबाहेरील मंडपात पोहोचली, जिथे लग्नाची तयारी सुरू होती.

बिअर पिऊन नाचली

त्याचवेळी आरोपी पत्नीने बिअर प्याली आणि ती इतर लोकांसोबत नाचतही होती. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामुळे जनतेत संताप आणि संतापाची लाट उसळली आहे. पोलिस सध्या घटनेच्या सर्व पैलूंचा तपास करत आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी