
पती, पत्नी आणि वो चं एक हैराण करणारं प्रकरण समोर आलय. 15 वर्षांपूर्वी मनोजच लग्न रुबीसोबत झालं. या जोडप्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. काही महिन्यांपूर्वी रुबी शेजारच्या गावात राहणारा युवक कौशलच्या संपर्कात आली. दोघांमध्ये हळू-हळू प्रेमसंबंध बहरले. नवरा मनोजला या बद्दल समजल्यानंतर तो रुबीवर चिडला व तिला समज दिली. घराकडे लक्ष द्यायला सांगितलं. काही दिवस सगळं काही सुरळीत सुरु होतं. एक दिवस मनोज बाहेर गेल्यानंतर रुबीने प्रियकर कौशलला घरी बोलावलं. त्यावेळी अचानक मनोज घरी आला. दोघांना त्याने नको त्या अवस्थेत पकडलं. समोरच दृश्य पाहून त्याच्या मनात प्रचंड राग आला.
मनोजने त्याचवेळी रुबीच्या माहेरच्या माणसांना बोलवून घेतलं. रुबीच लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून द्यायला सांगितलं. असं केलं नाही, तर एकदिवस रुबी प्रियकराच्या मदतीने मला संपवेल असं मनोजच म्हणणं होतं. आधी मनोजच्या घरच्यानी त्याच्या म्हणण्याच विरोध केला. प्रेमाचं भूत उतरवण्यासाठी रुबीला सुद्धा समजावलं. पण रुबी ऐकली नाही. आपण प्रियकर कौशल सोबतच राहणार यावर ती हट्टाला पेटली. त्यावर नवऱ्यासह सगळं कुटुंब तयार झालं. त्यानंतर पती मनोजने पत्नी रुबीच लग्न तिचा प्रियकर कौशलसोबत लावून दिलं. त्याने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत निरोपही दिला.
असं का केलं?
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधील हे प्रकरण आहे. एका असहाय्य पतीने पत्नीच लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं. त्यानंतर पत्नीची प्रियकारसोबत नव्या सासरी पाठवणी सुद्धा केली. पत्नीला बरच समजावलं. पण ती प्रियकरासोबत जाण्यावर ठाम होती. अखेर थकून हरुन आपल्यासोबत भविष्यात काही अघटित होऊ नये यासाठी पतीने पत्नीच तिच्या प्रियकरासोब लग्न लावून दिलं.
Love Affair
करारनाम्यात काय लिहिलय?
पत्नी-पत्नीने एक करारनामा केला. त्यावर नातेवाईकांची स्वाक्षरी आहे. त्या करारनाम्यात लिहिलेलं की, “मी माझ्या मर्जीने पत्नीच लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून देत आहे. आजपासून आमच्या दोघात काही नातं नसेल. आतापासून आम्ही दोघे वेगवेगळे राहणार. माझी पत्नी लग्नानंतर तिच्या प्रियकरासोबत राहिलं” परस्परसहमतीने हे सर्व झाल्याचा पुरावा म्हणून एक प्रत पत्नीने स्वत:कडे ठेवली. नवऱ्याकडे एक प्रत आहे. पोलिसांनाही एक प्रत दिली. या अजब विवाहाची गावभर चर्चा आहे. मनोजने दोन्ही मुलांना पत्नीच्या माहेरी पाठवून दिलं. स्वत: एकटा घरी आला.