AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Crisis : 46,000 मेट्रिक टन LPG भारतात आला, त्यातून किती गॅस सिलेंडर भरले जातील? देशात किती कोटी एलपीजी ग्राहक?

देशात वर्षागणिक एलपीजीची विक्री वाढत चालली आहे. पण त्या तुलनेत देशांतर्गत उत्पादन वाढलेलं नाही. आजही भारतात एकूण गरजेच्या फक्त 40 टक्के उत्पादन केलं जातं. भारत 60 टक्के एलपीजीसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. यात कतर, यूएई हे मिडिल ईस्टमधील देश आहेत.

LPG Crisis : 46,000 मेट्रिक टन LPG भारतात आला, त्यातून किती गॅस सिलेंडर भरले जातील? देशात किती कोटी एलपीजी ग्राहक?
LPG Crisis
| Updated on: Mar 17, 2026 | 8:35 AM
Share

इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धामुळे तेल आणि नैसर्गिक वायू LPG चं संकट निर्माण झालं आहे. कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद केलं आहे. तिथून कुठल्याही जहाजाला रवाना होण्यासाठी इराणची परवानगी घ्यावी लागते. भारताच्या कूटनितीक कौशल्यामुळे आतापर्यंत भारताची काही जहाजं हॉर्मुज स्ट्रेट पार करु शकली आहेत. गॅस संकटादरम्यान आता दिलासा देणारी एक बातमी आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज पार करुन शिवालिक हे भारतीय जहाज गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर पोहोचलय. सध्याच्या स्थितीत ही एक मोठी बाब आहे. कारण या मार्गावरुन जहाज बाहेर काढणं सोपं नाहीय. मुंद्रा बंदरात आलेल्या शिवालिकमध्ये 46,000 मेट्रिक टन LPG आहे. कतरहून हे जहाज निघालं होतं.

कतरहून आलेल्या या एलपीजीमधून देशात गॅस पुरवठा होईल. शिवालिक एक मोठं गॅस वाहू जहाज आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे हे जहाज चालवल जातं. आता अनेकांच्या मनात प्रश्न हा आहे की, जे शिवालिक 46,000 मेट्रिक टन घरगुती गॅस घेऊन पोहोचलय त्यात किती सिलेंडर भरले जाऊ शकतात. जेव्हा कुठल्या देशातून एलपीजी आणला जातो, तेव्हा तो लिक्विड फॉर्ममध्ये आयात केलेला असतो. लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे गॅस जास्त आणता येतो. 46,000 मेट्रिक टनमुळे किती सिलेंडर भरले जातील?. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आधी एकूण किती किलो गॅस आणलाय ते जाणून घेणं आवश्यक आहे.

46,000 मेट्रिक टन एलपीजीमधून किती गॅस सिलेंडर भरले जातील?

जर, एक जहाज 46,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन आलय, तर सर्वातआधी ते किलोग्रॅममध्ये बदलावं लागेल. एक मेट्रिक टन म्हणजे 1000 किलोग्रॅम झाले. 46,000 मेट्रिक टन किलोमध्ये बदलल्यास एकूण एलपीजी 4,60,00,000 किलोग्रॅम होतो. शिवालिकमधून भारतात 4,60,00,000 घरगुती गॅस आलाय. भारतात घरगुती गॅस सिलेंडर 14.2 किलोग्रॅमचा असतो. त्या हिशोबाने कॅलक्युलेट केल्यास सिलेंडरची एकूण संख्या 32 लाख 39 हजारपर्यंत पोहोचते. म्हणजे कतरहून आलेल्या एलपीजीमधून भारतात एकूण 32 लाख 39 हजार गॅस सिलेंडर भरले जातील. घरासाठीचा गॅस उतरवण्याला प्राथमिकता द्या त्यानंतर इतर कामासाठी असं सरकारकडून बंदर अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

भारतात घरगुती एलपीजीचे किती कोटी ग्राहक?

आकड्यांनुसार भारत जगातील तिसरा सर्वात मोठा LPG चा ग्राहक आहे. मागच्या 10 वर्षात देशात एलपीजीची विक्री 60 टक्क्याने वाढली आहे. 2015-16 साली 19.6 मिलियन मेट्रिक टन एलपीजी लागायचा. तोच आता 2024-25 मध्ये 31.3 एमएमटीची गरज लागते. भारतात घरगुती एलपीजीचे 33 कोटी ग्राहक आहेत. 2015-16 मध्ये हीच संख्या 16.6 कोटी होती. म्हणजे घरगुती गॅस ग्राहकांची संख्या दुप्पट झाली आहे.

Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर