AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बड्या नेत्यावर भर पत्रकार परिषदेत चाकू हल्ल्याचा प्रयत्न, थोडक्यात वाचले, मोठी खळबळ

पत्रकार परिषद सुरू असातनाच हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे, चाकू हल्ल्याच्या प्रयत्न करण्यात आला, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! बड्या नेत्यावर भर पत्रकार परिषदेत चाकू हल्ल्याचा प्रयत्न, थोडक्यात वाचले, मोठी खळबळ
Pappu YadavImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 02, 2026 | 6:53 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळालं, पप्पू यादव यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता असा आरोप आता या घटनेनंतर पप्पू यादव यांनी केला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पप्पू यादव यांची पत्रकार परिषद सुरू होती, पत्रकार परिषद सुरू असतानाच मोठा गोंधळ उडाला, पप्पू यादव यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. यावर आता खासदार पप्पू यादव यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, हल्लेखोर चाकू घेऊन पत्रकार परिषदेमध्ये आला होता, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

पप्पू यादव यांचं आंदोलन 

दरम्यान पप्पू यादव यांनी शुक्रवारी संसदेच्या बाहेर राम मंदिर चोरीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केलं होतं. ते साधूचा वेश परिधान करून संसद भवन परिसरात आले होते. या आंदोलनात सर्व विरोधी पक्षदेखील सहभागी झाले होते. विरोधी पक्षांच्या खासदारांच्या हातात दान पेट्या होत्या. पप्पू यादव यांच्या हातात देखील एक दान पेटी होती. खासदारांनी या दान पेटीत पैसे टाकले आणि पप्पू यादव हे ही दान पेटी घेऊन निघून गेले, राम मंदिर चोरीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राम मंदिर चोरीचं नाट्य रूपांतर करून संसद भवनाबाहेर अनोख आंदोलन करण्यात आलं होतं.

दरम्यान त्यानंतर आता रविवारी पप्पू यादव यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये पप्पू यादव यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोर चाकू घेऊन पत्रकार परिषदेमध्ये आलो हेते, माझ्या हत्येचा कट होता असा आरोप पप्पू यादव यांनी यावेळी केला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी