AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan: तुमच्यापेक्षा अधिक मुस्लिम तर…रडक्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात धु धु धुतले, रमजानची आठवण करुन देत भारताचा तो सज्जड इशारा?

India Slammed Pakistan : संयुक्त राष्ट्र संघात भारताने पाकिस्तानला धु धु धुतले. तर मुस्लिम जगताचे आपणच मसिहा असल्याचा आव आणणाऱ्या पाकड्यांना रमजान आठवण करून देत मोठा इशाराही दिला. धार्मिक वितुष्टाचे वातावरण तयार करणाऱ्या पाकिस्तानची बोलती बंद केली.

Pakistan: तुमच्यापेक्षा अधिक मुस्लिम तर...रडक्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात धु धु धुतले, रमजानची आठवण करुन देत भारताचा तो सज्जड इशारा?
भारत-पाकिस्तानImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 17, 2026 | 8:41 AM
Share

India Slammed Pakistan : जागतिक मंचावर पुन्हा एकदा पाकिस्तानची बोलती बंद झाली. मुस्लिम जगताचे आपणच मसिहा असल्याचा आव पाकिस्तान नेहमी आणतो. मुस्लिम विश्वाच्या नेतृत्वाची पाकला घाई झाली आहे. धार्मिक वितुष्ट पसरवण्याचा प्रयत्न हा शेजारी नेहमी करतो. भारताला इस्लामोफोबिया झाल्याच्या काल्पनिक कथा पाकडे नेहमी पसरवतात आणि त्यावर मगरीचे अश्रु गाळतात. त्यावरून संयुक्त राष्ट्र संघात भारताने पाकिस्तानला धु धु धुतले. बुरखा फाडल्याने पाकच्या प्रतिनिधीचा चेहरा पाहण्यासारखा झाला. भारताच्या आक्रमक भूमिकेने पाकचे अधिकारी वरमले. त्यांची बोलती बंद झाली.

तुमच्यापेक्षा अधिक मुस्लिम आमच्या देशात

पाकिस्तान जागतिक मंचावर वारंवार धार्मिक ओळख दाखवण्याचा आणि मुस्लिमांचे नेतृत्व आपल्याकडेच असल्याचा बनाव करते. पाकिस्तानची ही कृती समोर येताच भारताने पाकड्यांचा बुरखा फाडला. संयुक्त राष्ट्र संघात भारतीय प्रतिनिधींनी शेजाऱ्याला सळो की पळो करून सोडले. त्यावर पाकिस्तानी अधिकाऱ्यांची अत्यंत केविलवाणी अवस्था झाली. तुमच्यापेक्षा अधिक मुस्लिम आमच्या देशात आहेत आणि ते गुण्यागोविंदाने आणि कोणत्याही धार्मिक द्वेष रहित वातावरणात ते नांदतात हे भारताने प्रभावीपणे मांडले.

पाकिस्तान नेहमी इस्लामोफोबियाच्या काल्पनिक कथा मुस्लिम जगतात पेरतो. भारतातील मुस्लिम हे देशाचा अविभाज्य भाग आहे. तरीही खोट्या काल्पनिक कथा पसरवून भारताविरोधात वातावरण तयार करण्याचे आणि त्यामाध्यमातून जगाकडून भीक मागण्याचा पाकचा जुनाच धंदा आहे. तो पुन्हा एकदा उघड झाला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे कायमचे प्रतिनिधी पी. हरीश यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले. पाकिस्तानचे खोटे दावे समोर आणले.

भारताचा इशारा काय?

त्याचवेळी मुस्लिम जगाचा मसिहा म्हणणारा पाक, रमजान महिन्यात अफगाणी नागरिकांवर, लहान मुलांवर आणि रुग्णालयांवर हल्ले करत असल्याचे समोर आणले. अफगाणी नागरिकांना जबरदस्ती त्यांच्या देशात पाठवल्या जात आहे. त्यांचे व्यवसाय लुटले जात आहे. त्यांच्या पाकिस्तानमधील मालमत्तांवर कब्जे करण्यात येत आहेत, याविषयीचे मुद्दे सुद्दा संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत चर्चेला यायला हवीत असा इशारा देताच पाकच्या अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली. यावेळी भारतीय प्रतिनिधींनी पाकच्या लोकसंख्येपेक्षा अधिक 20 कोटी मुस्लिम भारतात राहतात, असे ठणकावले.

पाकिस्तानला भारताच्या बहुसांस्कृतिक समाजाची आणि शांतता धोरणाचा फोबिया झाल्याचा पलटवार करण्यात आला. जगाच्या पाठीवर असा वैविध्यपूर्ण देश नाही. पाकिस्तानमधील अहमदिया आणि इतर फिरक्यांची काय गत करण्यात आली आहे. त्या नागरिकांवर किती अत्याचार करण्यात येत आहे. हिंदू, शीख या अल्पसंख्यांक समुदायावर किती अत्याचार करण्यात येत आहे यावरही एकदा चर्चा व्हायला हवी असे भारताने म्हणताच पाक अधिकार्‍यांची बोलती बंद झाली.

Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली