
एका 29 वर्षीय महिलेने पतीची हत्या करुन या मृत्यूला आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला. रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या निहाल विहार भागात ही घटना घडली. महिलेने इतकं टोकाचं पाऊल उचलण्यामागच कारण म्हणजे नवऱ्याकडून तिला शरीरसुख मिळत नव्हतं. त्यात ती असमाधानी होती आणि नवऱ्याच्या चुलत भावासोबत तिचे प्रेमसंबंध होते. फरझाना खान असं आरोपी महिलेचं नाव आहे. मोहम्मद शाहीद ऊर्फ इरफान असं मृताचं नाव आहे. वैवाहिक नात्यामध्ये असंतुष्ट असल्याच तिने पोलिसांना सांगितलं. नवऱ्याकडून लैंगिक सुख मिळत नव्हतं तसचं पतीच्या चुलत भावासोबत माझं अफेअर होतं असं फरझानाने पोलिसांना सांगितलं. ऑनलाइन जुगाराच्या व्यसनामुळे नवरा कर्जात बुडालेला होता असं तिने सांगितलं.
“फरझानाने म्हणण्यानुसार वैवाहिक नात्यात ती नाखुश होती. शरीरसुख मिळत नसल्याने आणि जुगारामुळे आलेला आर्थिक ताण यामुळे ती त्रस्त होती. नवऱ्याच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध असल्याचही तिने कबूल केलं. तिचा प्रियकर बरेली येथे राहतो” असं वरिष्ठ पोलीस अधिकारी फरझानाच्या कबुली जबाबावर म्हणाला. पती मोहम्मद शाहीदची हत्या केल्यानंतर फरझानाने ती आत्महत्या आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न केला. ‘माणसाला संपवण्याचे मार्ग’ असं तिने तिच्या मोबाइलमध्ये सर्च केलं होता. त्यावरुन पोलिसांनी तिची चौकशी केली. हे जोडपं मूळच उत्तर प्रदेश बरेलीच आहे.
गुन्हा उघड कसा झाला?
रविवारी संध्याकाळी शाहीदला मृतावस्थेत त्याचा भाऊ संजय गांधी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. पोलिसांना या बद्दल सूचित करण्यात आलं. फरझानाच्या दाव्यानुसार जुगारामुळे कर्ज झाल्याने शाहीदने आत्महत्या केली असं भावाने पोलिसांना सांगितलं. शाहीदच्या मृतदेहावर तीन ठिकाणी भोसकल्याच्या जखमा पोलिसांना आढळून आलेल्या. जुगारामुळे कर्जात बुडाल्याने त्याने स्वत:ला भोसकून घेतलं असं पत्नीने पोलिसांना सांगितलं.
इंटरनेटच्या सर्च हिस्ट्रीमध्ये काय होतं?
सोमवारी पोस्टमार्टम रिपोर्टमधून हत्या असल्याचा निष्कर्ष निघाला. शरीरावरील जखमा एकसारख्या नाहीयत. एक जखम खूप जीवघेणी आहे, माणूस अशा पद्धतीने स्वत:ला मारु शकत नाही असं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं. त्यावरुन पोलिसांना फरझानावरील संशय बळावला. त्यांनी तिचा फोन तपासला. त्यातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या. तिच्या मोबाइलमधील इंटरनेटच्या सर्च हिस्ट्रीमध्ये संशय बळावणाऱ्या गोष्टी आढळल्या. झोपेच्या गोळ्या देऊन एखाद्याला कसं संपवू शकतो, चॅट हिस्ट्री कशी डिलीट करायची, हे तिने सर्च केलेलं. यावरुन पोलिसांनी फरझानाची कसून चौकशी केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताना फरझानाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.