क्रूरपणाची सीमा ओलांडली ! दिरासोबत होते विवाहबाह्य संबध, अडथळा ठरणाऱ्या पतीचा महिलेने घेतला जीव

| Updated on: May 19, 2023 | 2:18 PM

दीर आणि वहिनीच्या अवैध संबंधामध्ये नवऱ्याचा अडथळा येत होता. संशय आल्यावर नवऱ्याने दिराला घरी येण्यास मनाई केली. त्यामुळे दोघांनी कट रचून त्याला संपवले.

क्रूरपणाची सीमा ओलांडली !  दिरासोबत होते विवाहबाह्य संबध, अडथळा ठरणाऱ्या पतीचा महिलेने घेतला जीव
क्षुल्लक वादातून बहिणीने बहिणीला संपवले
Follow us on

Shahjahanpur Murder : विवाह्यबाह्य संबंधांमध्ये (extra marital affair) अडथळा ठरणाऱ्या पतीची , पत्नीने दिरासोबत मिळून हत्या (murder) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या हत्येचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या दिराला अटक करून तुरुंगात रवानगी केली. या दोघांकडून हत्येसाठी वापरलेले शस्त्रही पोलिसांनी जप्त केले आहे.

दीर आणि वहिनीच्या अवैध संबंधामध्ये नवऱ्याचा अडथळा येत होता. संशय आल्यावर नवऱ्याने दिराला घरी येण्यास मनाई केली. त्यामुळे दोघांनी कट रचून त्याला संपवले. त्यांनी आधी मृत इसमावा झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या, नंतर त्याचा गळा दाबून काठ्यांनी मारहाण करून त्याचा जीव घेतला.

लहान भावाला घरी येण्यास घातली होती बंदी

ही दुर्दैवी घटना अल्लाहगंज पोलीस स्टेशनच्या बगिया परिसरातील आहे. जिथे गुरुवारी मेकॅनिक अनोज ठाकूरचा मृतदेह घरात पडलेला आढळून आला. पोलिसांना मृताच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जखमेच्या खुणा आढळल्या. ही हत्या अन्य कोणी नसून अनोजची पत्नी सोनी आणि त्याचा लहान भाऊ श्याम पाल यांनी मिळून केल्याचे समजते. सोनी आणि दिरामध्ये अवैध संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बाब पती अनोज ठाकूर यांना समजली. त्यामुळे अनोजने लहान भावाला घरी येण्यास बंदी घातली होती. अशा स्थितीत अनोजची पत्नी सोनी आणि तिच्या दिराने मिळून कट रचून पिठात नशेच्या गोळ्या मिसळून रात्री त्याला त्या पिठाच्या पोळ्या खाऊ घातल्या. तो बेशुद्ध पडल्यानंतर दोघांनी मिळून त्याची गळा आवळून हत्या केली. एवढेच नाही तर दोघांनी त्याला लाठ्या-विटांनीही मारहाण केली.

दोघांनी मान्य केला गुन्हा

पोलिसांच्या चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. या हत्येचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या दिराला अटक करून तुरुंगात रवानगी केली. अवैध संबंधांमुळे ही हत्या झाल्याचे एसपी एस आनंद यांनी सांगितले. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.