
केप टाऊन | 23 सप्टेंबर 2023 : भारतासह जगभरातील देशांमध्ये महिलांवर अत्याचार होताना दिसून येतात. काही बदमाश त्यांना पाहून शिट्टी वाजवून अश्लील कमेंट करतात. तर काही जण अजून वेगळ्या मार्गाने त्रास देतात. पण जर ती मुलगी त्यांना घाबरली नाही किंवा तिने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर काहीजण त्यांना थेट शारीरिक त्रास देतात. असेच एक धक्कादायक (crime news) प्रकरण समोर आले आहे. मात्र त्या घटनेमुळे त्या मुलीचे आयुष्य अवघ्या २ मिनिटात पूर्णपणे बदलून गेले. कुठे घडली ही घटना जाणून घेऊया.
या घटनेतील पीडित मुलगी मित्राला भेटण्यासाठी बाहेर जात असतानाच, एका माणसाने तिच्याकडे पाहून शिट्टी वाजवली. पण त्या मुलीने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर त्याने तिला पाहून अश्लील कमेंट्सही केल्या, यामुळे ती मुलगी चिडली आणि त्याला विरोध दर्शवला. मात्र ते पाहून त्या तरूणाने जे केलं ते अतिशय धक्कादायक होतं, त्याने त्या तरूणीवर थेट विटेने वार केला. या हल्ल्यात त्या तरूणीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.
या हल्ल्यामुळे परिस्थिती एवढी बिघडली की तिचा एक डोळा निकामी झाला आणि काढावा लागला. तिच्या डोळ्याचे बरेच तुकडे झाले. अंतर्गत दुखापतीमुळे विटेचा काही भाग कवटीच्या आतही गेला. निकिता असे या २५ वर्षीय तरुणीचे नाव आहे. गेल्या महिन्यात, २६ ऑगस्ट रोजी तिच्यासोबत ही घटना घडली होती. ती दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनची रहिवासी आहे.
काय झालं त्यादिवशी ?
एका तरूण निकीताचा पाठलाग करत होता, तो तिच्या फ्लर्ट करू लागला. त्यावेळी ती तिच्या प्रियकराला भेटायला जात होती. मात्र तिच्या प्रियकराने त्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला असता तो काही वेळ थांबला. मग अचानक तो पुढे आला आणि त्याने निकिताच्या चेहऱ्यावर विटेने वार केले. या हल्ल्यानंतर निकिता बेशुद्ध झाली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. हल्ल्यामध्ये तिच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून तो काढावा लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या चेहऱ्यावरही अनेक टाके पडले.
यामुळे तिची आई खूपच व्यथित झाली असून मुलीच्या उपचारासाठी डोनेशनद्वारे पैशांची जुळवाजुळव करत आहे. जेणेकरून तिला कृत्रिम डोळे बसवता येतील. ‘ हे सर्व खूप कठीण होते. असे घडायला नको होते. या घटनेमुळे अवघ्या दोन मिनिटांमध्ये माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.’ असे निकिता म्हणाली. ऑपरेशननंतर ती स्वतःला आरशात बघूही शकत नाही नाही. तिची अवस्था खूप बिकट झाली आहे.