
लोकल प्रवास असो की एक्प्रेस जर्नी, खिसेकापूंची, चोरांची भीती तर सगळीकडेच असते. पम दिल्लीत मेट्रोत खिसेकापून, प्रस चोरांनी सध्या धूमाकूळ घातला आहे. तिथे रोज चोरीच्या अनेक बातम्या समोर येत असतात. असाच एक प्रकार 24 ऑगस्टला लाजपत नगर मेट्रो स्टेशनला घडला. तिथे राखी छाब्रा नावाच्या महिलेची पर्स चोरी झाली. पर्समधून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि काही महत्वाचे कागद गायबच झाले. त्या महिले आधी स्वत:च खूप शोधाशोध केली पण काहीच सापडलं नाही, अखेर 30 ऑगस्ट रोजी तिने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.
सीसीटीव्हीमुळे उलगडलं गुपित
एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. लाजपत नगर मेट्रो स्टेशनचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजमध्ये तीन महिला संशयास्पद पद्धतीने फिरताना दिसत होत्या. त्यांच्या हालचाली पाहून पोलिसांना चोरीचा संशय आला. त्यानंतर तपास केला असता (22), संध्या (20) आणि जान्हवी (22) अशी तिघींची ओळख पटली. त्या तिघीही शादिपुरच्या कठपुतली कॉलनीत राहणाऱ्या असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांचं खास पथक तैनात
पोलिसांनी त्या तिन्ही आरोपींना पकडण्यासाठी एक विशेष पथक तयार केले. त्या पथकाने संशयित तरूणींवर सतत लक्ष ठेवले आणि अखेर 1 सप्टेंबर रोजी त्यांना बेड्आ ठोकण्यात पोलिसांना यश मिळाले. या तिन्ही महिलांना सराय काले खान मेट्रो स्टेशनवरून पकडण्यात आले. अटक केल्यावर त्यांच्याकडून चोरीचे अनेक दागिने आणि जवळपास अडीच हजार रुपये जप्त करण्यात आले.
गर्दी पाहून टाकायच्या हात, चोरी करून फरार
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या तिघींची पद्धत खूपच हुशारीची होती. मेट्रो स्टेशनवर जास्त गर्दी असते तेव्हा त्या वाट पाहत असत. गर्दीचा फायदा घेऊन या तिघीजणी, महिला प्रवाशांच्या बॅग किंवा पर्समधून मौल्यवान वस्तू चोरायच्या आणि नंतर लगेच पुढच्या स्टेशनवर उतरायच्या. त्यामुळे चोरी झाल्याचे खूप उशीरा लक्षात यायचे आणि आरोपी महिला लगेच सुटायच्या.
तपासात असे आढळलले की, संजना ही आधीपासूनच चोरी करत असून ती कुख्यात गुन्हेगार आहे. तिच्याविरुद्ध मेट्रो पोलिस ठाण्यात तीन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. नेहरू प्लेस मेट्रो पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये संध्या आणि जान्हवीचे नाव देखील समोर आले आहे. तिघी मिळून एकत्र चोरी करायच्या आणि अनेक प्रवाशांना चुना लावून पळायच्या.