‘तुझ्या सारख्या 300-300 रुपयात मिळतात..’ अनैसर्गिक शरीरसंबंध, नवरा चुकीच बोलला, नंतर सगळी घाणेरडी सिक्रेट्स आली बाहेर

पती अनेकदा बोलतो की, तुझ्यासारख्या 300-300 रुपयात मिळतात. मी तुला नांदवणार नाही असा आरोप आहे. विवाहितेने नातं टिकवण्याचे बरेच प्रयत्न केले.

तुझ्या सारख्या 300-300 रुपयात मिळतात.. अनैसर्गिक शरीरसंबंध, नवरा चुकीच बोलला, नंतर सगळी घाणेरडी सिक्रेट्स आली बाहेर
Husband-Wife Fight
| Updated on: Sep 22, 2025 | 12:44 PM

पती-पत्नीमध्ये भांडणं होणं सामान्य बाब आहे. पण काही वेळा ते वाद इतके वाढतात की, दोघांना भारी पडतात. एका महिलेने आपल्या पतीवर गंभीर आरोप करत FIR नोंदवला. माझा नवरा नेहमी मला हेच म्हणतो की, माझ्यासारख्या 300-300 रुपयात मिळतात असं महिलेने तक्रारीत म्हटलं. उत्तर प्रदेश हाथरसची ही घटना आहे. पत्नीचा आरोप आहे की, पतीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. सासरी तिला हुंड्यासाठी छळलं जातं. महिलेचा पती मथुरेत राहतो. महिलेच माहेर हाथरसमध्ये आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, हाथरस जंक्शन क्षेत्र गावातील तरुणीच वर्षभरापूर्वी मथुरा जिल्ह्यातील फरह क्षेत्रातील तरुणाशी लग्न झालं. वडिलांनी लग्नात जवळपास 12 लाख रुपये खर्च केले. लग्नाच्यावेळी जे दान, हुंडा दिला, त्यावर सासरचे लोक नाखुश होते. पत्नीचा आरोप आहे की, पतीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. त्याशिवाय माझ्यासोबत अनसैर्गिक संबंध ठेवतो. विवाहितेने विरोध केल्यानंतर घरी उपाशी ठेवतात. अनेक दिवस काही खायला देत नाहीत असा महिलेचा आरोप आहे.

मानेला पकडून लाठी-काठीने मारहाण केली

पती अनेकदा बोलतो की, तुझ्यासारख्या 300-300 रुपयात मिळतात. मी तुला नांदवणार नाही असा आरोप आहे. विवाहितेने नातं टिकवण्याचे बरेच प्रयत्न केले. पण सासरच्या लोकांनी तिला घरातून काढून टाकलं. मानेला पकडून लाठी-काठीने मारहाण केली. आता या प्रकरणात घरगुती हिंसाचार आणि हुंड्यासाठी छळ या कलमांखाली गुन्हा दाखल झाला असून महिला पोलीस तपास करत आहेत.

‘माझे वडिल इतका पैसा देऊ शकत नाहीत’

पीडितेने सांगितलं की, “मी नेहमी नातं वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा छळ संपतच नव्हता. सुरुवातीला मी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. जेणेकरुन पती सुधारेल. नवराच नाही, सासरचे अन्य लोकही सपोर्ट करत नव्हते. त्यांना काही सांगताच विषय हुंड्यावर जायचा. म्हणायचे की, आम्हाला अजून हुंडा हवा. मी त्यांना सांगितलं की, माझे वडिल इतका पैसा देऊ शकत नाहीत. पण याने त्या लोकांना काही फरक पडत नव्हता”