
उरणमधील तरुणी यशश्री शिंदे हिच्या हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीये. यशश्री शिंदेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता समोप आलाय ज्यामध्ये काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी यशश्री शिंदे हिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टविषयी माहिती दिलीये. त्यांनी सांगितले की, तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचं शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झालंय. प्रथमदर्शनी हा एक खूनाचा प्रकार वाटतोय. दाऊद नावाच्या व्यक्तीवर कुटुंबाला संशय आहे. ज्याच्यावर 2019 मध्ये पोस्को अंतर्गत तरुणीनेच गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे दाऊद शेख हा सहा महिने तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा यशश्रीसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलीस अधिकारी विवेक पानसरे यांनी दिली आहे.
यशश्री हिचा मृतदेह एका पेट्रोलपंपाच्या जवळ आढळला आहे. तिच्या मृतदेहाच्या अवतीभवती भटके कुत्रे फिरत होते. स्थानिकांनी पोलिसांनी याबाबत माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यशश्रीच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. तिचा मृत्यू झाल्यानंतर प्राण्यांनी तिच्या शरीराचे अक्षरश: लचके तोडले होते. आपल्या मुलीला अशा स्थितीत पाहून कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. सध्या पोलीस दाऊद शेख याचा शोध घेत आहे. पोलिसांचे चार पथक त्याचा शोध घेत आहेत.
यशश्री शिंदेच्या हत्येचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी अमित काळे हे देखील घटनास्थळी पोहोचले होते. यशश्री शिंदे ही गुरूवारी मित्राकडे जात असल्याचं सांगून घरातून निघाली होती. पण ती जेव्हा रात्रीपर्यंत घरी आली नाही तेव्हा कुटुंबियांच्या चिंता वाढल्या. त्यांनी पोलिसाच धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर शुक्रवारी एका तरुणीचा मृतदेह एका निर्जन रस्त्यावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तरुणीची ओळख पटवण्यासाठी यशश्रीच्या पालकांना बोलवलं. तेव्हा तो मृतदेह तिचाच असल्याचं समोर आलं.
दाऊद शेख याच्यावर कुटुंबियांनी हत्येचा आरोप केला आहे. आता दाऊद शेखचा शोध सुरु आहे. तो मूळचा कर्नाटकचा आहे. जाऊद हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. पोलिसांना तो कर्नाटकला पळून गेल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांच्या 4 टीम बंगळुरूला रवाना झाल्या आहेत. पोलिसांनी दाऊद सोबत राहणाऱ्या लोकांना आणि त्याचा कुटुंबातील लोकांना ही ताब्यात घेतले आहे. दाऊदला पकडून फाशीची शिक्षा देण्याची मागणी यशश्री शिंदेच्या कुटुंबाने केलीये.