
जोधपूर : राजस्थामधून एक भयानक, संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. मात्र, तिच्या कुटुबियांनी त्याला लोखंडाच्या रॉडने अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर त्याला पाण्याच्या तांब्यात जबरदस्ती लघवी पाजली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय (youth beaten by his girlfriend family after he meet her and push for to drink Urine).
पीडित तरुणाचे चार लोकांवर आरोप
संबंधित व्हिडीओ 15 दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर येत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणाला पोलीस ठाण्यात बोलवून तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने चार लोकांवर गंभीर आरोप केले आहेत (youth beaten by his girlfriend family after he meet her and push for to drink Urine).
नेमकं प्रकरण काय?
पीडित तरुणावर कुणाच्या तरी घरात घुसण्याचा आरोप आहे. संबंधित घटना ही 8 मार्च रोजी घडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. पीडित तरुण त्याच्या मैत्रीणीला भेटण्यासाठी कोशलू गावात गेला होता. मात्र, तो तिला भेटायला गेला म्हणून मुलीच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली.
पोलिसांकडून व्हायरल व्हिडीओची दखल
संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बाडमेर जिल्ह्याचे सिणधरी पोलिसांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचला. संबंधित प्रकार आपल्याच हद्दीत घडल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी या व्हिडीओची गांभिर्याने दखल घेतली. त्यानंतर त्यांनी या व्हिडीओचा छळा लावला. तपासात त्यांना पीडित तरुण सापडला. हा तरुण ड्रायव्हर आहे. तो ड्रायव्हिंगचं काम करतो.
पीडित तरुणाच्या वडिलांची दोन लोकांविरोधात तक्रार
तरुणाच्या वडिलांशी जेव्हा पोलिसांनी बातचित केली तेव्हा त्यांनी दोन आरोपींची नावे सांगितली. “दोघी आरोपींनी आधी मुलाला आमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर त्याला लघवी पाजली. याशिवाय या घटनेबाबत कुणाला सांगितले तर आणखी वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीदेखील त्यांनी दिली. त्याच भीतीमुळे मुलाने या घटनेची कुणाला माहिती दिली नाही”, अशी माहिती पीडित तरुणाच्या वडिलांनी दिली.
पोलिसांची प्रतिक्रिया
“गेल्या दोन-तीन दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत तरुणाला प्रचंड मारहाण केली जातेय. याशिवाय युवकाला लघवी पाजली जाते. आम्ही या प्रकरणाचा तपास केला तर संबंधित मुलगा हा ड्रायव्हर आहे. तो ड्रायव्हिंगचं काम करतो. तो बाडमेर जिल्ह्यातील सिणधरी पोलीस ठाणे हद्दीत राहतो. याप्रकरणी हीराराम आणि जोगाराम या दोन आरोपींची ओळख पटली आहे. तपासात संबंधित व्हिडीओ हा सिणधारी पोलीस ठाणे हद्दीतील विष्णु मंदिर कोलू गावचा असल्याचं समोर आलं. याप्रकरणाचा तपास सुरु आहे”, अशी माहिती सिणधरी ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.