‘पप्पा बाहेर या, मला तुमची आठवण येतेय, ही लोकं तुम्हाला काहीच करणार नाही’, चार वर्षाच्या बालकाची अतिरेकी बापाला साद

अतिरेक्याच्या पत्नीने त्याला भावनिक साद घालत पोलिसांकडे सरेंडर होण्याची विनंती केली. "बाहेर या, नाहीतर मला गोळी घाला", अशा शब्दात अतिरेक्याच्या पत्नीने त्याला विनंती केली (wife and innocent son appeal to Terrorist for surrender in Shopian Jammu and Kashmir).

'पप्पा बाहेर या, मला तुमची आठवण येतेय, ही लोकं तुम्हाला काहीच करणार नाही', चार वर्षाच्या बालकाची अतिरेकी बापाला साद
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 3:59 PM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील काही भाग आजही संवेदनशील आहेत. दहशतवादी संघटना या भागातील तरुणांना पैशांचे आमिष देवून त्यांचे माथे फिरवतात. ते त्यांना आपल्याच देशाच्या आपल्या जवानांविरोधात भडकवून दहशतवादी कारवाई करण्यास भाग पाडतात. दहशतवादी संघटनांच्या भूलथांपाना बळी पडून भरकटलेल्या तरुणांना मार्गावर आणण्याचं सैनिकांपुढे मोठं आव्हान आहे. सैनिक आपल्या परिने प्रचंड प्रयत्नही करतात. मात्र, देशद्रोह करणाऱ्यांना नाईलाजाने अखेर कंठस्नान घालावच लागतं. पण त्याआधी जवान त्यांना सुधारण्याचा, आत्मसमर्पणाची संधी देतात. पण जवानांच्या विनंतीला न मानता जे आक्रमण करतात किंवा जवानांवर उलट गोळीबार करतात त्यांचा अखेर खात्माच करावा लागतो. असाच काहीसा प्रकार सोमवारी (22 मार्च) सकाळी जम्मू-काश्मीरच्या शोपिया भागात बघायला मिळाला (wife and innocent son appeal to Terrorist for surrender in Shopian Jammu and Kashmir).

नेमकं प्रकरण काय?

शोपिया येथे एका ठिकाणी चार दहशतवादी लपून बसले होते. यामध्ये एक स्थानिक तरुणही होता. त्याला सरेंडर करण्यासाठी जवानांनी वारंवार विनंती केली. पण त्याने ऐकलंच नाही. अखेर जवान त्याची पत्नी आणि चार वर्षाच्या बालकाला घटनास्थळी घेऊन आले. जेणेकरुन त्यांनी भावनिक साद घातली तर तो तरुण स्वत:ला सरेंडर करेल. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही (wife and innocent son appeal to Terrorist for surrender in Shopian Jammu and Kashmir).

चार वर्षाचा बालक आपल्या वडिलांना काय म्हणाला?

तरुणाच्या पत्नीने भावनिक साद घालत पोलिसांकडे सरेंडर होण्याची विनंती केली. “बाहेर या, नाहीतर मला गोळी घाला”, अशा शब्दात अतिरेक्याच्या पत्नीने त्याला विनंती केली. विशेष म्हणजे त्या अतिरेक्याचा चार वर्षांचा मुलगा त्याला जोरजारात ओरडून विनंती करत होता. “पप्पा बाहेर या, मी उफान राजा बोलतोय. आता बाहेर या. ही लोकं तुम्हाला काहीच करणार नाही. पप्पा बाहेर या. मला तुमची खूप आठवण येतेय”, असा निष्पाप बालक बोलत राहिला. पण त्याचे वडील अखेर बाहेर आलेच नाही. अखेर त्याला जवानांची कंठस्नान घातलं.

अतिरेकी 10 डिसेंबर पासून बेपत्ता

अतिरेक्याच्या पत्नी आणि चार वर्षाच्या मुलाने विनंती करुनही तो बाहेर आला नाही. तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या तीन जोडीदारांनी त्याला अडवलं, अशी माहिती समोर आली आहे. हा तरुण 10 डिसेंबर 2020 पासून आपल्या घरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर तो काहीतरी दहशतवादी कारवाई करण्याच्या बेताखाली शोपिया भागात लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलीस आणि जवानांनी त्याला स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एक संधी दिली होती. पण त्याने ती संधी धुडकावली. त्यामुळे जवानांपुढे अखेर त्याला कंठस्नान घालण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध राहिला नाही.

या घटनेचा व्हिडीओ बघा:

हेही वाचा : ‘अकील, स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन कर, आई-बाबा जिवंतपणीच मेलेत’, मोठ्या भावाच्या मनधरणीनंतर अतिरेकी सरेंडर

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.