10 मिनिटात तीन क्वाटर दारु, मग जे घडले त्याने सर्वच हादरुन गेले !

दारु प्यायल्यानंतर जयची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध पडला. याबाबत कुटुंबीयांना माहिती मिळाल्यानंतर ते त्याला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र उपचारादरम्यान जयचा मृत्यू झाला.

10 मिनिटात तीन क्वाटर दारु, मग जे घडले त्याने सर्वच हादरुन गेले !
दारु पिण्यास अडवले म्हणून मुलाने बापाला संपवले
Image Credit source: Google
| Updated on: Feb 13, 2023 | 6:04 PM

आग्रा : दारु पिण्याची पैज एका व्यक्तीच्या जीवावर बेतली आहे. दोन मित्रांनी मयत व्यक्तीसोबत 10 मिनिटात 3 क्वाटर दारु पिण्याची पैज लावली होती. ही पैज जिंकण्यासाठी त्याने ती क्वाटर दारु 10 मिनिटात रिटवलीही. मात्र त्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जय सिंह असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी जयच्या कुटुंबीयांनी पैज लावणारे दोघे मित्र भोला आणि केशव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ताजगंज पोलीस ठाण्याअंतर्गत शिल्पग्राम येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

तिघे मित्र दारु प्यायला गेले

जय सिंह, भोला आणि केशव हे तिघे मित्र दारु पिण्यासाठी गेले होते. यावेळी भोला आणि केशव यांनी जयसोबत 10 मिनिटात 3 क्वाटर दारु पिण्याची पैज लावली होती. जयने ही पैज स्विकारली आणि एक एक करुन 10 मिनिटात तीन क्वाटर दारु रिचवली.

दारु प्यायल्यानंतर तरुण बेशुद्ध पडला

दारु प्यायल्यानंतर जयची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध पडला. याबाबत कुटुंबीयांना माहिती मिळाल्यानंतर ते त्याला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र उपचारादरम्यान जयचा मृत्यू झाला.

याप्रकरणी जयच्या कुटुंबीयांनी भोला आणि केशव विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेवेळी जयकडे 60 हजार रुपये असून ते गायब असल्याचा दावा जयच्या कुटुंबीयांनी केला आहे.

दोघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक

पोलिसांनी भोला आणि केशवविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.