बॉडीबिल्डर सुहास खामकरच्या नावे फेक अकाऊण्ट, अनेक तरुणींची फसवणूक

बॉडीबिल्डर सुहास खामकर यांच्या नावे फेक फेसबुक अकाऊण्ट तयार करुन अनेक तरुणींशी आक्षेपार्ह भाषेत संवाद साधला जात असल्याचा आरोप होत आहे

बॉडीबिल्डर सुहास खामकरच्या नावे फेक अकाऊण्ट, अनेक तरुणींची फसवणूक
Follow us
| Updated on: Sep 16, 2019 | 3:43 PM

मुंबई : आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन देश-विदेशात अनेक किताब मिळवणाऱ्या सुहास खामकर यांच्या नावाचा गैरफायदा घेत (Suhas Khamkar Fake Account) तरुणींची फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खामकर यांच्या नावे फेक फेसबुक अकाऊण्ट तयार करुन (Suhas Khamkar Fake Account) अनेक तरुणींची फसवणूक झाल्याची माहिती आहे.

सुहास खामकर यांचे देश विदेशात अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर अनेक जण सुहास खामकर यांना फॉलो करत असतात. याचाच फायदा काही समाजकंटक घेत आहेत. खामकर यांच्या नावाचं फेसबुकवर खोटं अकाऊंट तयार करुन तरुणी आणि महिलांशी संवाद साधला जात असल्याचा आरोप होत आहे.

आई ‘बेस्ट’मध्ये कंडक्टर, अंडर 19 आशिया चषक गाजवणाऱ्या अथर्व अंकोलेकरचं अंधेरीत जंगी स्वागत

अनेक वेळा तर तरुणींना आपण सुहास खामकर बोलत आहोत, अशा प्रकारचा फोनही केला जातो. इतकंच नाही, तर त्यांच्याशी आक्षेपार्ह भाषेत (Suhas Khamkar Fake Account) बोललं जातं, असा दावा केला जात आहे.

या प्रकारामुळे सुहास खामकर यांची बदनामी होत आहे. याबाबत खबरदारी म्हणून तोतयांविरोधात खामकर यांनी मुंबईतील टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत सायबर कक्षाद्वारे ही चौकशी होणार आहे.

सुहास खामकर यांच्या नावाने जी अकाऊंट आहेत, ती व्हेरिफिकेशन केलेली म्हणजे निळी टिकमार्क केलेली (Suhas Khamkar Fake Account) आहेत. त्यामुळे कोणीही इतर अकाऊंटसोबत व्यवहार करु नये, जर आपणास कोणी खोटा फोन केला असल्यास आपण खामकर यांच्याशी अथवा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सुहास खामकर यांनी केलं आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.