पुण्यात ब्रेकअपने 'मजनू' घायाळ, मुलीच्या हॉस्टेलबाहेर हवेत गोळीबार

पुणे: पुण्यात एका ‘मजनू’ने मुलींच्या वसतिगृहाबाहेर हवेत गोळीबार करुन शोबाजीचा प्रयत्न केला. ब्रेकअप झाल्याच्या रागातून या सिरफिऱ्या आशिकने थेट मुलीच्या हॉस्टेलबाहेर हवेत गोळ्या झाडल्या. बालेवाडी परिसरात ही घटना घडली. गोळीबार करणाऱ्या युवकाला चतु:श्रृंगी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे. सध्या पुणे आणि अपराध हे समीकरणं बनत चाललं आहे. दररोज विद्यानगरीत खून, मारामारी, …

पुण्यात ब्रेकअपने 'मजनू' घायाळ, मुलीच्या हॉस्टेलबाहेर हवेत गोळीबार

पुणे: पुण्यात एका ‘मजनू’ने मुलींच्या वसतिगृहाबाहेर हवेत गोळीबार करुन शोबाजीचा प्रयत्न केला. ब्रेकअप झाल्याच्या रागातून या सिरफिऱ्या आशिकने थेट मुलीच्या हॉस्टेलबाहेर हवेत गोळ्या झाडल्या. बालेवाडी परिसरात ही घटना घडली. गोळीबार करणाऱ्या युवकाला चतु:श्रृंगी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.

सध्या पुणे आणि अपराध हे समीकरणं बनत चाललं आहे. दररोज विद्यानगरीत खून, मारामारी, चोरी, हत्याकांड अशा घटना समोर येत आहेत. त्यातच लपवाछपवीच्या प्रेमप्रकरणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांची संख्याही अधिक आहे. बालेवाडी परिसरातील गोळीबाराची घटनाही प्रेमप्रकरणातूनच झाली.

मुलीसोबत ब्रेकअप झालेल्या मजनूने सैरभैर होऊन थेट बंदूक उचलली. त्यानंतर तो मुलगी राहात असलेल्या वसतिगृहाबाहेर गेला. तिथे जाऊन वसतिगृहाच्या बाहेर थेट हवेत गोळीबार करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. आंधळ्या प्रेमात आपण काय करतोय, याची भनक या सिरफिऱ्या मजनूला नव्हती. हवेत झाडलेल्या गोळीने कुणाला स्पर्श केला असता तर एखाद्याचा जीव गेला असता. तुमचं प्रेम व्हायचं आणि एखाद्याचा जीव जायचा, असंच काहीसं तूर्तास तरी होता होता वाचलं म्हणावं लागेल.

सध्या या सिरफिऱ्या मजनूला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *