चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने पत्नीला घराबाहेर आणले, फेसबुक मित्रांच्या मदतीने बलात्कार

एका 25 वर्षीय पतीने पत्नीसोबत गँगरेप केल्याने जोगश्वरी पोलिसांनी पतीला अटक केली (Husband gang rape on wife) आहे.

चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने पत्नीला घराबाहेर आणले, फेसबुक मित्रांच्या मदतीने बलात्कार

मुंबई : एका 25 वर्षीय पतीने पत्नीसोबत गँगरेप केल्याने जोगश्वरी पोलिसांनी पतीला अटक केली (Husband gang rape on wife) आहे. ही घटना नोव्हेंबर 2019 मध्ये घडली असून पीडित तरुणीने जानेवारी 2020 मध्ये याची तक्रार दाखल केली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. आरोपी पतीने आपल्या दोन फेसबुकवरील मित्रांकडून पत्नीवर गँगरेप केला, असा आरोप पतीवर आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक (Husband gang rape on wife) तपास सुरु आहे.

पालघर येथील एक ऑटोरिक्षा चालक आपल्या पत्नीला जोगेश्वरी येथे चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने घेऊन आला. पण चित्रपट दाखवण्याऐवजी तो अशा जागी घेऊन गेला तेथे त्याचे दोन फेसबुक मित्र अभिषेक आणि मंगेश यादव उपस्थित होते. तेथे आरोपी पतीने आपल्या पत्नीवर त्या दोघांना बलात्कार करण्यास सांगितले. तसेच स्वत:ही बलात्कार केला, असं पोलिसांनी सांगितले.

या सर्व घटनेनंतर पीडित महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर पालघर पोलिसांनी आरोपी पतीला जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये पाठवले. विशेष म्हणजे ही घटना गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातली असून पीडित तरुणीने जानेवारी 2020 मध्ये पालघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *