बहिणीच्या आत्महत्येचा सूड, एकाच कुटुंबातील तिघींची हत्या, दोषींना आजन्म कारावास

सांगली : सांगली जिल्ह्यातील हिवरे गावातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोन्ही आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आई, मुलगी आणि सून अशा एकाच कुटुंबातील तीन महिलांची साडेचार वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. बहिणीच्या आत्महत्येचा सूड घेण्याच्या भावनेने आरोपींनी (Sangli Hiware Triple Murder Verdict) हे कृत्य केलं होतं. तिहेरी हत्याकांडातील आरोपी सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम […]

बहिणीच्या आत्महत्येचा सूड, एकाच कुटुंबातील तिघींची हत्या, दोषींना आजन्म कारावास
Follow us
| Updated on: Feb 04, 2020 | 1:22 PM

सांगली : सांगली जिल्ह्यातील हिवरे गावातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोन्ही आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आई, मुलगी आणि सून अशा एकाच कुटुंबातील तीन महिलांची साडेचार वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. बहिणीच्या आत्महत्येचा सूड घेण्याच्या भावनेने आरोपींनी (Sangli Hiware Triple Murder Verdict) हे कृत्य केलं होतं.

तिहेरी हत्याकांडातील आरोपी सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम यांना मरेपर्यंत कारावास आणि एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सांगली सत्र न्यायालयाने आज (4 फेब्रुवारी) हा निकाल दिला.

जून 2015 मध्ये आरोपींनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात प्रभावती शिंदे आणि सुनिता पाटील या मायलेक जागीच ठार झाल्या होत्या, तर गंभीर जखमी झालेली सून निशा शिंदे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

आरोपी सुधीर घोरपडेची बहीण विद्याराणी हिचं लग्न हिवरे येथील शिंदे कुटुंबात झालं होतं. लग्नानंतर सासरची मंडळी विद्याराणीला त्रास देत असल्याचा माहेरच्या मंडळींचा आरोप होता. त्यानंतर विद्याराणीने आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून सासरच्या व्यक्तींनी विद्याराणीची हत्या केल्याची फिर्याद माहेरच्यांनी विटा पोलिस ठाण्यात दिली होती.

या खटल्यातून शिंदे कुटुंबीय निर्दोष सुटलं होतं. शिंदे कुटुंब निर्दोष सुटल्यामुळे सुधीर घोरपडे हा शिंदे कुटुंबावर चिडून होता. सूडभावनेने आरोपी सुधीर घोरपडेने आपल्या मित्रांच्या मदतीने ही हत्या केली होती. सुधीर घोरपडे, रवींद्र कदम आणि एक अल्पवयीन तरुणीने तिहेरी हत्या केल्याचा आरोप होता. न्यायालयाने सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम यांना दोषी ठरवलं होतं.

दोन्ही दोषींना मृत्युदंड देण्याची मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षातर्फे न्यायालयात (Sangli Hiware Triple Murder Verdict) केली होती.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.