Amaravati College Reopen : अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार, नेमकं कारण काय?

| Updated on: Feb 03, 2022 | 1:24 PM

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठातील अमरावती (Amravati) जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

Amaravati College Reopen : अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार, नेमकं कारण काय?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

अमरावती: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना (Corona) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यानं महाविद्यालय आणि शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानं शाळा (School Reopen) महाविद्यालय पुन्हा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील पहिली ते बारावीचे वर्ग 24 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, 1 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णसंख्या घटल्याने राज्यातील शाळा व महाविद्यालय पुन्हा एकदा सुरू करण्या संदर्भात परवानगी दिल्याने अनेक जिल्ह्यात शाळा व महाविद्यालय सुरू करण्यात आले आहेत. मात्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठातील अमरावती (Amravati) जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.तसेच अमरावती विद्यापीठातील कामकाजही 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्णपणे बंद राहील.

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अकोला बुलडाणा जिल्ह्यात कॉलेज सुरु

अमरावती विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील महाविद्यालय 1 फेब्रुवारी रोजी सुरू झाले आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यात महाविद्यालये 4 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात येणार आहेत.तसेच वाशिम जिल्ह्यातील महाविद्यालये अद्याप सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. त्या त्या जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन संबधित जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख यांनी दिली.

अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालय 15 फेब्रुवारीपासून सुरु

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी सलंग्न असलेली अमरावती जिल्ह्यातील कॉलेज 15 फेब्रुवारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सुरु होण्याची शक्यता आहे. तर, अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालये तातडीने सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

अमरावतीमध्ये बुधवारी 241 कोरोनाबाधित

अमरावती जिल्ह्यात बुधवारी नव्याने 241 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार बुधवारी अमरावती जिल्ह्यात 241 नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत अमरावती जिल्ह्यातील एकूण रूग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 464 झाली आहे.

इतर बातम्या:

 

किरण माने पुन्हा मैदानात, उद्या पत्रकार परिषद घेणार, अनेकांची गुपितं उघड करण्याचा इशारा

Parambir Singh: हिरेन प्रकरणाचा मास्टरमाइंड परमबीर सिंगच, काही बातम्या सिस्टिमॅटिकली पेरल्या जाताहेत; सतेज पाटील यांचा आरोप