CBSE 12th Board Exam 2021: बारावीच्या परीक्षेला महत्वाच्या विषयांचे पेपर? सीबीएसईचं बोर्ड परीक्षेचं नेमकं प्लॅनिंग काय?

CBSE 12th Board Exam 2021 सीबीएसई बोर्ड बारावीच्या परीक्षा आयोजित करताना केवळ मुख्य विषयांच्या पेपर घेऊ शकते.

CBSE 12th Board Exam 2021: बारावीच्या परीक्षेला महत्वाच्या विषयांचे पेपर? सीबीएसईचं बोर्ड परीक्षेचं नेमकं प्लॅनिंग काय?
सीबीएसई 12 वी चा निकाल जाहीर, अशी डाऊनलोड करा मार्कशीट
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 11:46 AM

CBSE 12th Board Exam 2021 नवी दिल्ली:केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhariyal Nishank) यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांची, शिक्षण सचिवांची आणि राज्य परीक्षा बोर्डांच्या अध्यक्षांची बैठक होत आहे. आज होणाऱ्या सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे भूषवणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल.या बैठकीमध्ये बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याबाबत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये बारावीच्या परीक्षासंबंधी फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. सीबीएसई बोर्ड देखील बारावी परीक्षांबाबत फॉर्म्युला जाहीर करेल, अशी शक्यता वर्तवली जातेय. (CBSE 12th Board Exam  2021 news latest updates cbse may be take Major Subjects paper only)

मुख्य विषयांचीच परीक्षा?

मिळालेल्या माहितीनुसार सीबीएसई बोर्ड बारावीच्या परीक्षा आयोजित करताना केवळ मुख्य विषयांच्या पेपर घेऊ शकते. यामुळे बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यास देखील मदत होऊ शकणार आहे. सीबीएसई कडून बारावीच्या अभ्यासक्रमासाठी एकूण 176 विषय निश्चित केलेले असतात. या विषयांपैकी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी विषय निवडायचे असतात. त्यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप एल असे दोन भाग केलेले असतात. ग्रुप ए मधील विषय हे महत्त्वाचे मानले जातात. त्या आधारेच विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.

ग्रुप ए मधील मधील नेमक विषय कोणते?

ग्रुप ए मध्ये एकूण 20 विषय असतात. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, विज्ञान, गणित, जीवशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, व्यवसाय अभ्यास, अकाऊँट्स भूगोल, अर्थशास्त्र आणि इंग्रजी अशा एकूण वीस विषयांचा समावेश असतो. एकूणविषयांपैकी विद्यार्थ्यांना कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त सहा विषयांची निवड करावी लागते. यामध्ये चार विषय हे हे मुख्य विषय म्हणजेत ग्रुप ए मधील असतात. सीबीएससी बोर्ड जर केवळ मुख्य विषयांची परीक्षा आयोजित करणार असेल तर नियमित परीक्षेच्या स्वरूपानुसार या परीक्षेचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे.

याशिवाय दुसरा पर्याय कोणता?

सीबीएसई बोर्ड सर्व विषयांच्या पेपर्सच आयोजन करू शकते. यासाठी परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम छोटा केला जाऊ शकतो. मात्र, शिक्षणमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक झाल्यानंतरच याविषयी अधिक स्पष्टता येऊ शकणार आहे.

रमेश पोखरियाल निशंक यांचे ट्विट

संबंधित बातम्या

CBSE 12th board Exams 2021: बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय? राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय होणार, रमेश पोखरियाल यांनी शिक्षणमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली

पदवीचा 40 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवावा लागणार, यूजीसीनं सूचना मागवल्या

( CBSE 12th Board Exam 2021 news latest updates cbse may be take Major Subjects paper only)

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.