CBSE Exam Date Sheet 2021: सीबीएसई 10 वी, 12 वी परीक्षेच्या वेळापत्रकाची रमेश पोखरियालांकडून घोषणा, टाईम टेबल कुठे पाहणार?

| Updated on: Feb 02, 2021 | 5:40 PM

CBSE Exam Date Sheet 2021 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचं वेळापत्रक रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केलं आहे.

CBSE Exam Date Sheet 2021: सीबीएसई 10 वी, 12 वी परीक्षेच्या वेळापत्रकाची रमेश पोखरियालांकडून घोषणा, टाईम टेबल कुठे पाहणार?
रमेश पोखरियाल निशंक
Follow us on

CBSE Date Sheet | नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhariyal Nishank) यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE Date Sheet) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेमुळे सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालं आहे. अखेर विद्यार्थ्यांना विषयनिहाय परीक्षेची तारीख समजणार आहे. 4 मे ते 10 जून या काळात ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक cbse.nic.in आणि cbse.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झालं आहे. (CBSE exam date sheet 2021 of 10th and 12th classes date and time)

सीबीएसईच्या बोर्ड परीक्षा 4 मेपासून सुरु आहेत. हळूहळू कोरोनातून आपण मुक्त होत आहोत. कोरोनाचा समर्थपणे आपण सामना केला आहे. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देत आहे. दोन कोरोना लसी उपलब्ध असल्यामुळे घाबरु नका. परीक्षेची डेट शीट देताना आनंद होत असल्याचं रमेश पोखरियाल निशंक म्हणाले.

विद्यार्थ्यांना परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड एप्रिलममध्ये मिळण्याची शक्यता आहे. यंदा परीक्षेचा अभ्यासक्रमही 30 टक्क्यांनी कमी करण्यात आलाय. त्यामुळेच यंदाच्या परीक्षांमध्ये 33 टक्के पर्यायी निवडीचे प्रश्न असणार आहेत.

सीबीएसईचं वेळापत्रक कसं पाहाल?

1. सर्वात आधी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट www.cbse.nic.in आणि www.cbse.gov.in ला भेट द्या.
2. ‘Latest@CBSE’ लिंकवर क्लिक करुन आपला वर्ग निवडा.
3. यानंतर तुमच्या वर्गाप्रमाणे इयत्ता दहावी किंवा बारावीचं वेळापत्रक दिसेल.
4. या ठिकाणी तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करु शकता किंवा सेव्ह करुन प्रिंट करु शकता.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यात सीबीएसईच्या परीक्षांचाही समावेश होता. अखेर कमी होत असलेल्या निर्बंधांनंतर शालेय परीक्षा घेण्यास सुरुवात झालीय. परीक्षेच्या वेळी कोरोना संबंधित सर्व नियमांचं पालन केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. सर्व शाळांमध्ये 1 मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. या परीक्षांचा निकाल जुलै 2021 पर्यंत घोषित होईल, असा अंदाज आहे.

सबंधित बातम्या:

विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की न्यायालयाच्या चकरा मारायच्या? उच्च न्यायालयाने CBSE ला फटकारलं

JEE आणि NEET परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सल्ला

(CBSE exam date sheet 2021 of 10th and 12th classes date and time)