AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE Exam Time Table 2021: सीबीएसई परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होणार, डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होण्याची वेळ अखेर ठरलीय.

CBSE Exam Time Table 2021: सीबीएसई परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होणार, डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत
प्रतिकात्मक फोटो
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 01, 2021 | 9:15 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होण्याची वेळ अखेर ठरलीय. मंगळवारी (2 फेब्रुवारी) सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अखेर विद्यार्थ्यांना विषयनिहाय परीक्षेची तारीख समजणार आहे. 4 मे ते 10 जून या काळात ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक cbse.nic.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल (CBSE exam time table 2021 of 10th and 12th classes date and time).

विद्यार्थ्यांना परीक्षेचे अॅडमिट कार्ड एप्रिलममध्ये मिळण्याची शक्यता आहे. यंदा परीक्षेचा अभ्यासक्रमही 30 टक्क्यांनी कमी करण्यात आलाय. त्यामुळेच यंदाच्या परीक्षांमध्ये 33 टक्के पर्यायी निवडीचे प्रश्न असणार आहेत.

सीबीएसईचं वेळापत्रक कसं पाहाल?

1. सर्वात आधी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट www.cbse.nic.in ला भेट द्या. 2. लिंकवर क्लिक करुन आपला वर्ग निवडा. 3. यानंतर तुमच्या वर्गाप्रमाणे इयत्ता दहावी किंवा बारावीचं वेळापत्रक दिसेल. 4. या ठिकाणी तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करु शकता किंवा सेव्ह करुन प्रिंट करु शकता.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यात सीबीएसईच्या परीक्षांचाही समावेश होता. अखेर कमी होत असलेल्या निर्बंधांनंतर शालेय परीक्षा घेण्यास सुरुवात झालीय. परीक्षेच्या वेळी कोरोना संबंधित सर्व नियमांचं पालन केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. सर्व शाळांमध्ये 1 मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. या परीक्षांचा निकाल जुलै 2021 पर्यंत घोषित होईल, असा अंदाज आहे.

हेही वाचा :

विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की न्यायालयाच्या चकरा मारायच्या? उच्च न्यायालयाने CBSE ला फटकारलं

JEE आणि NEET परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सल्ला

‘अकरावीला प्रवेश देताना CBSE, ICSE विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण गृहित धरु नये’

व्हिडीओ पाहा :

CBSE exam time table 2021 of 10th and 12th classes date and time

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...