CBSE News : CBSE 10वी- 12वीच्या खासगी विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया झाली सुरू; केव्हापर्यंत भरता येणार फॉर्म? कसा भरायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
CBSE ने 2027 च्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. केव्हापर्यंत फॉर्म भरता येणार? काय आहे प्रक्रिया? फी किती जाणून घ्या सविस्तर

दहावी किंवा बारावीत परीक्षेत अपेक्षित यश मिळालं नाही, काही विषयांत पुन्हा परीक्षा द्यायची आहे किंवा मिळालेले गुण सुधारायचे आहेत? अशा विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रिय माध्यामिक शिक्षण मंडळाने ( CBSE ) 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीपर्यंतच्या बोर्ड परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. मात्र अर्ज करताना अंतिम मुदत आणि पात्रतेचे नियम लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. CBSE ने 7 ऑक्टोबर 2026 रोजी खासगी विद्यार्थ्यांसाठी अर्जासंबंधी सूचना जारी केली आहे. त्यानुसार 8 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2026
मुदत संपल्यावर अर्ज करण्याची मुदत : 24 ते 30 ऑक्टोबर 2026 फी : 2000 रूपये आकारले जाणार
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारता येणार आहेत. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ऑफलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट पाहता वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे आहे.
अर्ज कसा करायचा ?
- सर्वप्रथम CBSE ची अधिकृत वेबसाईट उघडा.
- Private Candidate या विभागात जा
- दहावी किंवा बारावी परीक्षेसाठी संबंधित अर्ज निवडा
- तुमची पात्रता तपासून अर्जातील आवश्यक माहिती भरा. मागितलेली कागदपत्रं, फोटो आणि सही नियमानुसार अपलोड करा.
- लागू असलेलं परीक्षा शुल्क ऑनलाईन भरा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रत आणि पेमेंटची पावती सांभाळून ठेवा
अर्ज भरताना रोल नंबर, परीक्षा केंद्रासाठी निवडलेलं शहर आणि इतर तपशील काळजीपुर्वक तपासा. परीक्षा केंद्राचं वाटप झाल्यानंतर केंद्र बदलण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही. असं CBSE ने स्पष्ट केलं आहे.
परीक्षा फी किती आहे?
भारतातील खासगी विद्यार्थ्यांसाठी लेखी परिक्षेची फी प्रति विषय 320 रूपये आहे. प्रात्याक्षिक परीक्षा असलेल्या विषयांसाठी भारतातील विद्यार्थ्यांना प्रति विषय 160 रूपये
एक्स्ट्रा फी लागू होऊ शकते. जास्त उशीर केल्यास हीच फी वाढून 2,000 रूपये भरावे लागणार आहेत.
2027 च्या मुख्य बोर्ड परीक्षा फ्रेब्रुवारी, मार्च किंवा एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम वेळापत्रकासाठी CBSE च्या अधिकृत घोषणेसाठी प्रतीक्षा करावी.