CBSE Result 2023 Updates : सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CBSE Board Result 2023 चा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. ३८ लाखाहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना निकालाची प्रतिक्षा आहे. निकालाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

CBSE Result 2023 Updates : सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर
| Updated on: May 08, 2023 | 10:30 AM

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या निकालाची 38 लाखाहून अधिक विद्यार्थी वाट पाहत आहेत. यंदा सीबीएसई बोर्डाचे ( CBSE Board ) दहावी आणि बारावीचे 38 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. निकालाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण या आठवड्यात निकाल येणं अपेक्षित आहे.

सीबीएसई बोर्डाचा 10वी आणि 12वीचा निकाल एकत्र जाहीर होण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून अजून कोणतीही तारीख जाहीर केलेली नसली तरी देखील 13 मे पूर्वी निकाल लागण्याची अपेक्षा आहे.

सीबीएसईने बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवरून निकाल पाहू शकतात. निकाल डाउनलोड करण्यासाठी cbse.gov.in, cbseresults.nic.in आणि results.cbse.nic.in. या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

CBSE बोर्ड मार्कशीट 2023 कशी डाउनलोड करावी

अधिकृत वेबसाइटवर जा – cbse.gov.in
CBSE बोर्ड 10वी किंवा 12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
एक नवीन लॉगिन पृष्ठ उघडेल
तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका
मार्कशीटमध्ये प्रवेश करा आणि डाउनलोड करा
प्रिंट आउट घ्या

38 लाखांहून अधिक विद्यार्थी प्रतिक्षेत

एकूण 21,86,940 विद्यार्थी CBSE इयत्ता 10 च्या परीक्षेला बसले होते आणि 16,96,770 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसले होते. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आता निकालाची प्रतिक्षा आहे.

गेल्या वर्षी, सीबीएसई 10वीचा निकाल 22 जुलै रोजी दुपारी 2 वाजता जाहीर झाला होता आणि सीबीएसई 12वी बोर्डाचा निकाल सकाळी 9 वाजता जाहीर झाला होता. आकडेवारीनुसार, CBSE 12वी 2022 च्या निकालात उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी 92.71 टक्के होती. CBSE 10वी निकाल 2022 मध्ये एकूण उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी 94.40 टक्के होती.