
नवी दिल्ली: आयसीएसई बोर्डाच्या (ICSE Results) इयत्ता दहावीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यानंतर आज इयत्ता 12वीचे निकाल लागणार आहेत. आज सायंकाळी 5 वाजता निकाल जाहीर होणार आहेत. बोर्डाने याबाबतची घोषणा केली आहे. जे विद्यार्थी आयसीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसले होते, ते बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात. इयत्ता बारावीचे निकाल (12th class) कधी लागणार याची विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता लागली होती. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे. विद्यार्थ्यांना results.cisce.org या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना (students) आपल्या रोल नंबर युनिक आयडी नंबरच्या मदतीने निकाल पाहता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकाल पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही विद्यार्थीनीच या निकालात बाजी मारणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आयसीएसई बोर्डाच्या इयत्ता 12वीचा निकाल पाहण्यासाठी results.cisce.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
त्यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
यावेळी INDEX NO आणि UID नंबर मागितला जाईल. तो त्यात नमूद करा.
त्यानंतर तुमच्या स्क्रिनवर निकाल दिसू लागेल
आयएससीची परीक्षा यंदा 6 एप्रिल ते 13 जून रोजी आयोजित केली आहे. CISCE ने ISC, इयत्ता बारावीची परीक्षा दोन सेमिस्टरमध्ये आयोजित केली होती. पहिला सेमिस्टर नोव्हेंबर- डिसेंबर 2021मध्ये पार पडला. दुसरा सेमिस्टर एप्रिल-मे आयोजित करण्यात आला होता. एसएमसएसद्वारेही विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. एसएमएसद्वारे निकाल पाहण्यासाठी यूनिक आयडी टाईप करायचा. उदा: ISC 1234567, त्यानंतर हा मेसेज 09248082883 या नंबरवर पाठवा. निकाल कळेल.
यंदा ICSE बोर्ड 10चा निकाल आधीच जाहीर झाला आहे. या परीक्षेत विद्यार्थीनींनी चांगली कामगिरी केली आहे. मुलांच्या तुलनेत यंदा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक आहे. यंदा 99.98 टक्के विद्यार्थीनी पास झाल्या. तर 99.97 टक्के मुलं पास झाली आहेत.