Board Exams : १०वी १२वी च्या निकालाची बातमी !

| Updated on: Apr 05, 2022 | 4:11 PM

दहावी बारावीचे पेपर तपासण्यास शिक्षकांनी नकार दिला होता त्यामुळेच हा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. प्रलंबित मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.

Board Exams : १०वी १२वी च्या निकालाची बातमी !
निकालासंदर्भात महत्त्वाची बातमी
Follow us on

मुंबई : दहावी बारावीच्या निकालासंदर्भात महत्त्वाची बातमी हाती आली आहे. पुणे राज्य शिक्षण मंडळातर्फे १०वी १२वी चा निकाल (Result) १० जून आधीच जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. १२ वीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होईल त्यानंतर ८ दिवसांनी १० वीचा निकाल जाहीर होईल असं शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे.
दहावी बारावीचे पेपर तपासण्यास शिक्षकांनी (Teachers) नकार दिला होता त्यामुळेच हा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. प्रलंबित मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी पेपर तपासणीवर (Paper Checking) बहिष्कार टाकला आहे. पण बोर्डाकडून आता राखीव १२ हजार शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. यात एका शिक्षकाकडे २५० पेपर तपासणीची जबाबदारी देण्यात येणार आहे.

पेपर तपासणीवर बहिष्कार टाकून विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये

विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान मिळावे. या शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण मिळावे या मागण्यांसाठी शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. परंतु शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकून विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये या सगळ्याचा निकालावर परिणाम होणार नाही अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन

बारावीचे पेपर उशिरा सुरु झाल्याकारणाने बारावीचा निकालही १० जूनपर्यंत आधी जाहीर करण्यात येईल आणि दहावीचा निकाल पेपर झाल्यावर ८ दिवसांनी लागेल असं बोर्डाने सांगितलंय. दहावीची परीक्षा १५ मार्चपासून सुरु झाली असून ४ एप्रिल रोजी दहावीचा शेवटचा पेपर होता. बारावीची परीक्षा ४ मार्चला सुरु झाली असून ती येत्या ७ एप्रिलला संपणार आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन आयोजित करण्यात आल्या आहेत.

गेल्यावर्षीचा दहावी बारावीचा निकाल हा ९९ टक्क्यांहून अधिक लागला होता. शेवटच्या पेपरच्या ६० दिवसानंतर निकाल जाहीर केला जातो.

इत्तर बातम्या :

Health Care Tips : रात्री उशीरा खाण्याची सवय आहे? मग या गोष्टी नक्कीच वाचा आणि वेळीच सवय बदला! 

भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो, तर मग त्यांना बिस्किटं टाका; पालिका अधिकाऱ्यांचा अजब सल्ला

Latur Market : हरभऱ्याची आवकही वाढली अन् दरही, शेतकऱ्यांचे लक्ष सोयाबीनवरच