SSC Students | दोन वर्षानंतर प्रथमच दहावीच्या शाळा लवकर , एप्रिल महिन्यात पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने वर्ग भरणार

कोरोना काळामुळे दोन वर्ष विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आकलनावर परिणाम झाला असून आता पुन्हा एकदा ऑफलाइन वर्गांद्वारे प्रयत्न करून विद्यार्थ्यांना प्रवाहात आणले जाईल.

SSC Students | दोन वर्षानंतर प्रथमच दहावीच्या शाळा लवकर , एप्रिल महिन्यात पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने वर्ग भरणार
संग्रिहत छायाचित्र
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Apr 01, 2022 | 11:11 AM

मुंबई | कोरोना काळात (Corona Pandemic) दोन वर्ष प्रचंड अडचणींचा सामना करणाऱ्या शाळा व्यवस्थापनांनी आता आपली घरी पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचे मोठे आव्हान शाळांसमोर आहे. मागील वर्षी नववीतून दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांचा (10th school) अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अचडणी आल्या होत्या. कोरोनाच्या वाढत्या प्रमाणानुसार शाळांवरही निर्बंध येत होते. मात्र आता रुग्णसंख्या घटल्यामुळे आणि निर्बंधही शिथिल करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांवर अधिक मेहनत घेण्याचे ठरवण्यात आले आहे. स्टेट बोर्डातील (State board schools) शाळांमध्ये एप्रिल महिन्यातच दहावीचे वर्ग सुरु करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.

फक्त मे महिन्यात सुटी

या वर्षी नववीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची बॅच दहावीत गेलेली असेल. या विद्यार्थ्यांचे निकाल 27 एप्रिल रोजी जाहीर होतील. त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी 1 जून पासून सुरु होईल, अशी माहिती सायन स्कूलच्या मुख्याध्यापकांनी दिली. स्टेट बोर्डाशिवाय असलेल्या सीबीएसई आणि सीआयएससीई बोर्डाच्या शाळांचेही नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. या शाळांचे वर्गदेखील आता पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने भऱवण्यात येतील. दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम एक एप्रिलपासून सुरु झाला असून त्यांना फक्त मे महिन्यात सुटी असेल, असे सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापाकांनी सांगितले.

जून महिन्यापासून ऑफलाइन वर्ग

कोरोना काळामुळे दोन वर्ष विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आकलनावर परिणाम झाला असून आता पुन्हा एकदा ऑफलाइन वर्गांद्वारे प्रयत्न करून विद्यार्थ्यांना प्रवाहात आणले जाईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना फक्त मे महिन्यात सुटी दिली जाईल. त्यानंतर 1 जूनपासून त्यांचे पुन्हा एकदा वर्ग सुरु होतील. तसेच इतर वर्गांच्या शाळादेखल 13 जूनपासून सुरु होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या-

No Mask In Maharashtra : आजपासून राज्यात काय काय बदल ? मास्क गेले, कोणकोणते निर्बंध मागे

Bhandara | बलात्कारातून पीडितेने दिला बाळाला जन्म, DNA चाचणीतून मिळाला न्याय, दरमहा पोटगी देण्याचा कोर्टाचा आदेश


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें